Breaking News

Tag Archives: hasan mushrif

सरकारने दिले धर्मादाय रूग्णालयांना हे आदेश नियमाप्रमाणे १० टक्के गरिब रूग्णांना उपचार द्या मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री तटकरे

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये १० टक्के गरिब रूग्णांना मोफत उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य …

Read More »

कोरोनाने मृत्यू पावलेल्या या १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखाची मदत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत …

Read More »

उमेद अभियानांतर्गत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी करणार नाही अफवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका -मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानांतर्गत महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच महिला सक्षमीकरणासाठी सध्या सुरु असलेल्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असून त्या तशाच पुर्ववत सुरु राहणार आहेत. याबद्दल निर्माण करण्यात आलेले समज चुकीचे आहेत. महिला वर्गाने अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू  नये, असे आवाहन अभियानाचे …

Read More »

एकाच दिवसात दोन मंत्र्यांना कोरोना ट्विटरवरबून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील अनेक राज्यमंत्री, मंत्री कोरोनाबाधित होत आहेत. त्यात आ एकदम दोन कॅबिनेट मंत्र्याचा समावेश झाला आहे. यात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल आज सकारात्मक आहे. यापैकी मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती स्वत:  ट्विटरवरून दिली. अहवाल सकारात्मक झाल्यानंतर या …

Read More »

महाराष्ट्राच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा राज्याला मिळाला ई पंचायतराज पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार – २०२०  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »

या विधेयकावरून फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये झाली खडाजंगी हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवारांच्या उत्तराने झाले नाही समाधान

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासंदर्भातील विधेयक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधासभेत मांडले. मात्र त्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेत सध्या हे याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने त्याबाबतचे विधेयक सभागृहात मांडता येत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे …

Read More »

तो आदेश रद्द केल्याने आता गावाकडील घराच्या मालमत्तेवर कर्ज मिळणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना …

Read More »

ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय: आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करमाफी मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत काल निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी …

Read More »

मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनांना आता विमा संरक्षण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना …

Read More »

परभणीतील त्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाखांची मदत प्रस्तावास तातडीने एका दिवसात मंजुरी -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी दिली. सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी …

Read More »