Breaking News

अजित पवार यांच्या उपस्थितीत जळगांव कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रमेश नागराज पाटील, सचिन पाटील यांच्यासह रावेर मतदारसंघातील माजी नगरसेवक, माजी सभापती, सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, विविध राजकीय पक्षांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

अजित पवार यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. यावेळी कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, सरचिटणीस रवींद्र पाटील, सावदाचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, करण खलाटे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपामधील अनेकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ;अजित पवार यांनी केले स्वागत…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपा पक्षातील अनेक मान्यवरांनी बुधवारी देवगिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

अजित पवार यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेल्यांची नावे खालीलप्रमाणे – बसवराज सणगावे (माजी नगराध्यक्ष), नरेंद्र भद्रापूर (माजी उपनगराध्यक्ष), उदय पाटील (माजी उपनगराध्यक्ष), अनुप पाटील (सरपंच), सतिश इटी (शिक्षण मंडळ सदस्य), विनोद बिलावर ( उद्योजक) अभिषेक पाटील (उद्योजक) शंकर घुगरे (सामाजिक कार्यकर्ते) संजय पाटील, (सामाजिक कार्यकर्ते) तारिरभाई कोचरगी, (सामाजिक कार्यकर्ते) गुरुप्रसाद नूलकर आदी.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ झाला शिवजयंतीचा सोहळा

काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *