Breaking News

Tag Archives: kolhapur

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी दिले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना हे आव्हान निवडणूकीतील डिपॉझिट जप्त करण्याची ताकद

मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तुळजापूर मध्ये राहोत किंवा कोल्हापूरमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला …

Read More »

मंदिर सुरु करण्याबाबत विनंत्या करण्यात येतायत… वाचा मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले याप्रश्नी पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूरचा आढावा घेताना सूचक वक्तव्य

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिर सुरु करण्याबाबत अनेक राजकिय पक्ष, संघटनांच्यावतीने विनंत्या करण्यात येत आहेत. मात्र सावधानता बाळगावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत आणखी काही दिवस तरी राज्यातील मंदिरे उघडली जाणार नसल्याचे सुतोवाच केला. पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनावरील उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी वरील सूचक …

Read More »

“त्या” पुराला अलमट्टी नव्हे तर अतिवृष्टी आणि अतिक्रमण, बांधकामे जबाबदार वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर

मुंबई : प्रतिनिधी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भाग आलेला पूर हा कर्नाटकातील अलमट्टी आणि हिपरग्गा जलाशयामुळे आलेला नसल्याचा अहवाल वडनेरे समितीने दिला असून या पुरास प्रामुख्याने नदीच्या परिसरातील पात्राचे संकुचिकरण, अतिवृष्टी याबरोबरच नागरीकरण, अतिक्रमण आणि बांधकामे जबाबदार असल्याचा ठपका या समितीने ठेवला. सदर अहवाल भविष्यकालीन उपायोजनासाठी नक्कीच उपयोगी …

Read More »

१ लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवसेना देणार दप्तरे कोल्हापूरात ४९ हजार तर सांगलीत २८ हजार विद्यार्थ्यांना दप्तरे देणार

मुंबईः प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील काही भागात आलेल्या पुरांमुळे अनेक नागरीकांच्या घरांतील सामानाबरोबरच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही वाहून गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पूरग्रस्त १ लाख विद्यार्थ्यांना दप्तरे देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ४९ हजार …

Read More »

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीसह हेक्टरी ६० हजार मदत द्या मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी ६० हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकारकडे केली. …

Read More »

पूरग्रस्‍तांच्या मदत व पुर्नवसनासाठी केंद्राकडे ६ हजार ८१३ कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्‍तांच्या मदतीसाठी व पुर्नवसनासाठी केंद्र सरकारकडे ६ हजार ८१३ कोटींची मदत मागण्यात आली असून केंद्राची मदत येईपर्यंत ही रक्‍कम तातडीने खर्च करण्यास राज्‍य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पूरग्रस्‍त भागातील पडझड झालेली तसेच पूर्ण नष्‍ट झालेली घरे सरकार बांधून देणार आहे. तर २०८८ कोटींची नुकसान भरपाई पिकांसाठी देण्यात येणार …

Read More »

कोल्हापूर, सांगली, कराडमधील १ लाख हेक्टर जमिनीच्या नुकसानीचा अंदाज अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविल्याची मुख्य सचिवांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूर व सांगलीत पुरामध्ये अडकलेल्या आतापर्यंत २ लाख ५२ हजार ८१३ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या पुरामुळे १ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली. …

Read More »

कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने …

Read More »

शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजूरी सार्वजनिक बांधकाम मंत्री चद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि पुरातन महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रूपये तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेत राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि यवतमाळ …

Read More »