आज सकाळपासून लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागांचा तिढा सोडविण्यावरून बैठक सुरु होती. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे हे शिवसेना उबाठा गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात असतानाच उद्घव ठाकरे यांनी श्रीमंत शाहु महाराज यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर श्रीमंत शाहु महाराज यांच्या उपस्थितीच बारामतीत ज्या प्रमाणे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे आहेत. तसे कोल्हापूरातून शाहु महाराज हे महाविकास आघाडी उमेदवार आहेत अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
यावेळी काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला की, कोल्हापूर लोकसभा निवडणूकीची जागा काँग्रेसला सोडली आहे तर…. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, शाहु महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज भरतील किंवा शिवसेना उबाठा गटाकडून भरतील तो मुद्दा गौण आहे. पण शाहु महाराज हे मविआचे कोल्हापूरातून उमेदवार राहणार असल्याचे जाहिर केले.
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं सगळं उघड उघड असतं इतरांसारखं लपून छपून नसतं असा उपरोधिक टोलाही मनसेचे नाव न घेता लगावला.