Breaking News

आता वंचित अघाडीची सत्ता संपादन महारँली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपकडून महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जन आर्शीवाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवस्वराज्य यात्रा आणि काँग्रेसची महाफर्दापाश यात्रा काढण्यात आल्या. आता त्याच धर्तीवर राज्यातील वंचित, बहुजन समाजाला आकृष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्ता संपादन महारैली काढण्यात येणार असून या यात्रेची सुरुवात 8 सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. तर या यात्रेचा समारोप कोल्हापुर येथे होणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केली. दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील जनता त्यांचे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीकड़े आशेने पाहत आहे. सध्याचे सरकार जनतेच्या समस्या , विकासाचे प्रश्न यावर चर्चा करीत नाही. मात्र आम्ही असे मानतो की, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाण्याची समस्या , शेती व उद्योग कारखाने ,ग्रामीण विकास , नागरी सुविधा अश्या विकासाच्या अजेंड्यावर महारैली मधून चर्चा घड़वली पाहिजे. जनतेच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेण्यासाठी या रँलीचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
8 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता नागपुरमधील संविधान चौक येथून ही महारँली हजारोंच्या संख्येने सुरु होणार असून ह्या महारँलीचे नेतॄत्व व्हिबीए संसदीय मंडळ सदस्य अण्णाराव पाटील करणार आहेत.
ही महारैली विदर्भात नागपूर येथून सुरु होवून संपूर्ण मराठवाड़ा मार्गे पश्चिम महाराष्ट्रात येणार आहे. कोल्हापुर येथे या महारँलीची सांगता होणार आहे. महारँली करीता स्टार प्रचारक देखील असणार आहेत ज्यात सैय्यद मजीद, एड विजय मोरे,नवनाथ पडळकर, सुभाष तंवर इ. नेत्यांचा समावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महारँली
नियोजित कार्यक्रम खालील प्रमाणे
————————
दिनांक आणि जिल्हा
———————–
८ सप्टेंबर, २०१९
नागपूर
हिंगणा, सेलू, वर्धा
८ सप्टेंबर, २०१९
वर्धा,
देवळी, राळेगाव, यवतमाळ
—————–
९ सप्टेंबर, २०१९
यवतमाळ
कळंब, बाभूळगाव, नांदगाव, चांदूर, अमरावती
९ सप्टेंबर, २०१९
अमरावती
भातुकली, मुर्तीजापुर, अकोला
—————–
१० सप्टेंबर, २०१९
अकोला
शेगाव, खामगाव, मोताळा, बुलढाणा
——————–
१० सप्टेंबर, २०१९
बुलढाणा
चिखली, मेहकर, रिसोड, मालेगाव, वाशीम
——————–
११ सप्टेंबर, २०१९
वाशिम
शेलू, हिंगोली
———————
११ सप्टेंबर, २०१९
हिंगोली
कळमनुरी, हदगाव, अर्धापूर, नांदेड
———————-
१३ सप्टेंबर, २०१९
नांदेड
पूर्णा, परभणी
१३ सप्टेंबर, २०१९
परभणी
मानवत, शेलू, परतूर, जालना
———————-
१४ सप्टेंबर, २०१9
जालना
बदनापूर, औरंगाबाद
१४ सप्टेंबर, २०१९
औरंगाबाद
गंगापूर, नेवासा (पांढरीपूल मार्गे शेगाव)पार्थडी,
शिरूरकासार, बीड
———————
१५ सप्टेंबर, २०१९
बीड,
वडवणी, धारूर, केज, अंबाजोगाई, रेणापूर, लातूर
१५ सप्टेंबर, २०१९
लातूर,मुरुड, तेर, उस्मानाबाद
———————–
१६ सप्टेंबर, २०१९
उस्मानाबाद
तुळजापूर, सोलापूर

१६ सप्टेंबर, २०१९
सोलापूर
मोहोळ, माळशिरस, इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड, हडपसर, पुणे
———————–
१७ सप्टेंबर, २०१९
पुणे
भोर (कापूरहोळ), खंडाळा, लोणद, फलटण, कोहरेगाव, सातारा
१७ सप्टेंबर, २०१९
सातारा
कराड, इस्लामपूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकंणगले, कोल्हापूर

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *