Breaking News

फ्रूट वायनरी उद्योगासाठी फक्त रू.१ इतके नाममात्र उत्पादन शुल्क जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासूनची वाईन स्वस्त दरात उपलब्ध होणार

मुंबईः प्रतिनिधी
फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्षव्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रति बल्क लिटर रू. १ इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील फळ उत्पादकांना होणार आहे.
या निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व फळांचा उत्पादन कोकण पट्टयात मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे या भागातील फलउत्पादकाला निश्चितच याचा फायदा होईल. द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाइन्स व मीड वाईन्सवर उत्पादन खर्चाच्या १०० टक्के उत्पादन शुल्क आकारण्यात येत होतं. याचा थेट परिणाम म्हणून इतर सौम्य मद्याच्या तुलनेत (बीअर व वाईन्स) या वाईन्स व मीड्स बऱ्याच महाग मिळतात. त्याचा परिणाम हा थेट विक्रीवर होत होता. बीअरच्या एका ३३० मि.ली बाटलीची किंमत साधारण रू. १५०-१८० आहे. तर ७५० मि.ली ची साधारण टेबल वाईन रू.२५० ते ४०० रुपये या दराने बाजारात मिळते. या तफावतीचा परिणाम म्हणून हे वायनरी उद्योग दर महिना केवळ ७०० ते ८०० पेट्या महाराष्ट्रात विकू शकत होते. शिवाय गेल्या २ वर्षात या उद्योगात केवळ ४ नवीन उद्योजक जोडले गेले. त्यामुळे या वाईन उद्योगास चालना मिळण्याकरीता तसेच सं‍बंधित शेतकरी व आदिवासींना प्रोत्साहन देण्याकरीता उत्पादन शुल्क विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंदं इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या वाईन/मद्यावर प्रति बल्क लिटर रू. १ इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकरले जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे वाईन आणि इतर फळांपासून तयार होणाऱ्या मद्याच्या उत्पादनाला चालना मिळेल.

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *