Breaking News

वंचित आघाडी उज्ज्वला गँस वापरणाऱ्यांना १०० रू. अनुदान देणार आशा, अंगणवाढी सेविकांच्या मानधनात वाढ करणार असल्याची आंबेडकर यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात सत्तेवर आल्यानंतर राज्यातील उज्ज्वला गँस वापरणाऱ्या कुटुंबियाना एका गँस मागे १०० रूपयांचे अनुदान देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचे जाहीर आश्वासन देत
महाराष्ट्रात आज ६९ हजार आशा स्वयंसेविका कार्यरत असून सुमारे ३५०० ह्या गटप्रवर्तक काम करत आहेत. आशा स्वयंसेविकाना महाराष्ट्र सरकारकडून कामावर आधारीत मोबदला मिळून सध्या दरमहा अल्प मानधन सरकारकडून दिले जाते. तर गट प्रवर्तकाना टीएडीए धरून मासिक मानधन फार थोडे दिले जाते. वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास स्वयंसेविकांचे मानधन दरमहा ३००० रूपये करण्यात येईल आणि पुढे ते वाढवत अंगणवाडी सेविकेच्या दरमहा मानधनाच्या निम्मे केले जाणार असून आशा सेविकासाठी असलेली एपीएल, बीपीएल अट काढून टाकण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
त्याचबरोबर भविष्यात इतर राज्यातील मानधना इतके त्यांचे मानधन करण्यात येणार आहे. हजारो अंगणवाडी सेविकांचे दरमहा मानधन आज जे ७,००० रुपये आहे ते १०,००० रुपये पर्यंत वाढविण्यात येणार असून त्यात भविष्यातही आणखी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रात काम करताना जनतेची विशेषता महिला व लहान बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाची संविधानिक जबाबदारी ही सरकारची आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *