Breaking News

Tag Archives: asha worker

आशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे ? भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या जीवनाशी न खेळता  सरकारने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव …

Read More »

ग्रामीण भागातील मुलींना, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना १० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी राहण्याकरिता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय मुलींना …

Read More »

आशा स्वयंसेविकांसाठी खुशखबर : ४ महिन्याचे वाढीव मानधन दिवाळीच्या आधी मिळणार वाढीव मोबदला देण्यासाठी ५७ कोटी वितरित- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य …

Read More »

लोकलबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे संकेत कोरोना पाहुण्याला घालविण्यासाठी खबरदारी घ्या-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्र्तिनिधी गेली सात महिने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेसह काही ठराविक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने मुभा दिली. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा लोकल प्रवास पुन्हा खुला होणार असल्याची अपेक्षा निर्माण झाली परंतु त्याविषयी मुख्यमंत्री …

Read More »

आशा स्वंयसेविका, गटप्रवर्तकांनी प्रस्तावित कामबंद आंदोलन स्थगित करा मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केले आहे. शासननिर्णय निर्गमित लवकरच मोबदला मिळणार मुख्यमंत्र्यांनी आपल्या …

Read More »

आशा स्वयंसेविकांना १५ हजारापर्यतचे मानधन मिळू शकते आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आशा स्वयंसेविकांना आतापर्यत फक्त दोन हजारारूपयांपर्यतचे मानधन मिळत होते. आता त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचे दोन हजार आणि केंद्राचे दोन हजार रूपये असे मिळून त्यांना चार हजार रूपये आणि कामाच्या स्वरूपानुसार त्यांच्या मानधनात वाढ करत प्रती महिना १५ हजार रूपयांचे मानधन त्यांना मिळू शकते …

Read More »

अमित ठाकरेंनी लिहिले उपमुख्यमंत्री पवार आणि आरोग्य मंत्री टोपेंना पत्र आरोग्य सैनिक असलेल्या आशा सेविकांना सन्मानजनक मानधन द्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाधिक मदत आणि पुढाकार घेणाऱ्या आरोग्यसेविका अर्थात आशा वर्करना इतर राज्यात चांगले मानधन मिळत असताना महाराष्ट्रात फारच कमी मानधन मिळते. त्यामुळे या आशावर्करना चांगले-सन्मान जनक मानधन द्यावे अशी मागणी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र …

Read More »

आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील गावांमध्ये सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र …

Read More »

ग्रामीण भागातील २ लाख ७३ हजार कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे संरक्षण अंगणवाडी, आशा वर्कर आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी निर्णय: ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाख रकमेच्या विमा संरक्षणाचे कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन …

Read More »

वंचित आघाडी उज्ज्वला गँस वापरणाऱ्यांना १०० रू. अनुदान देणार आशा, अंगणवाढी सेविकांच्या मानधनात वाढ करणार असल्याची आंबेडकर यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यात सत्तेवर आल्यानंतर राज्यातील उज्ज्वला गँस वापरणाऱ्या कुटुंबियाना एका गँस मागे १०० रूपयांचे अनुदान देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचे जाहीर आश्वासन देत महाराष्ट्रात आज ६९ हजार आशा …

Read More »