Breaking News

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, अब की बार भाजपा तडीपार

आगामी लोकसभा निवडमूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी एकाबाजूला निवडणूकीची तयारी जोरात केलेली असतानाच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्त पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्यावतीनं आयोजित पहिल्याच मेळाव्याला मार्गदर्शन आणि राजकिय मित्र म्हणून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल चढवित म्हणाले की, काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केलं. पण जे काँग्रेसला जमले नाही. ते मागील १० वर्षात भाजपाने करून दाखविलं. नुकतीच एक आकडेवारी बाहेर आली. त्यात काँग्रेसकडे ८०० कोटी रूपये इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून मिळाल्याची आकडेवारी पुढे आली. तर भाजपाला ८ हजार कोटी रूपये इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून मिळाले. मग मागील ६० वर्षे सत्तेत राहुन काँग्रेसने फक्त ८०० कोटी कमावले. तर यांनी फक्त १० वर्षात ८ हजार कोटी कमावले. मग आता सांगा देश लुटला कोणी? असा सवाल करत भाजपावर टीका केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान दोन वेळा समुद्रात गेले होते. एकदा ते अंदमानच्या बेटावर तर दुसऱ्यावेळी द्वारकेत समुद्रात जाऊन समुद्राच्या पाण्यातील मंदिराचे दर्शन गेले. इतकेच काय तर अरब देशातही जाऊन आले. पण मोदींना अजून मणिपूरला जाता आलं नाही. तेथील महिलांच्या दुःखावर फुंकर घालता आली नाही.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. यांना जर वाटत असेल की ईव्हीएमच्या बळावर निवडणूका जिंकू. तर ते कदापीही शक्य होणार नाही. ज्या अयोध्येत रामाचे मंदिर उभारले तो राम काय त्यांच्या एकट्याच्या मालकीचा नाही. एकाबाजूला रामाचे नाव घ्यायचं आणि इथल्या महिला, युवकांना बेघर-बेरोजगार ठेवायचे हे कसले रामाचे भक्त हे शिकविणार रामाची भक्ती. यांना फक्त हिंदूत्वाच्या नावावर हुकूमशाही राबवायची आहे. आमंच हिंदूत्व हे असंल नाही. आमचं हिंदूत्व हे असंल नाही आम्ही देशातील सर्व देवादीकांना आणि रामांना मानणाऱ्यांचं आमचं हिंदूत्व आहे. ज्या पध्दतीने संत गाडगे महाराज हे गावो गावी स्वच्छता करत फिरायचे. ते ही देवाला मानायचे. दरवर्षी पंढरपूरला वारीला जायचे. त्यांना कोणीतरी विचारलं की पांडूरंगाचे दर्शन घेतले. त्यावेळी ते म्हणाले होते, माझा इथे वारीत आलेल्या प्रत्येकात देव आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांसाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. म्हणजे त्याच्यातील देव रागावणार नाही. नाहीतर घाण वाढेल आणि त्या घाणीमुळे रोगराई होईल असे सांगत माणसांमध्ये देव पाहायचे असा किस्साही सांगितला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे शत्रुच्या विरोधात नेहमी कमिनी काव्याचा वापर करायचे. पण त्यांनी मित्राच्या विरोधात गमिनी काव्याचा वापर करून दगा दिल्याचे एक तरी उदाहरण शोधून सापडेल का? असा सवाल करत मागच्यावेळी आमचे ४० आमदार-खासदार आले म्हणून हे २७० पार पोहोचले. पण आता हे आमच्या पाठीत खंजीर खुपसून फोडा फोडी करून आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून ४०० पारचा नारा देत आहेत. पण मी म्हणतो पण माझी घोषणा अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा देत तुम्ही ४०० पार जाताच कसे बघतो असे आव्हानही यावेळी भाजपाला दिले.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता लोकांनीच ठरवायचंय की तुम्हाला सत्तेत आल्यामुळे माज आलेले माजलेले हवेत की तुम्हाला समजून घेणारे समाजवादी लोकं हवी आहेत. ही लढाई मी माझ्यासाठी लढत नसून तुमच्यासाठी आपल्या भावी पिढ्यांसाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी या लढाईत मी उतरलो आहे. लोकशाही जिवंत राहीली तर हा देश राहिल आणि देश राहिला तर तुम्ही आम्ही राहु. मग नंतर बघु धर्म कसा जिवंत राहील ते असेही स्पष्ट केले.

Check Also

पिडीत महिला अपहरण प्रकरणी एच डी रेवन्ना यांना अटक

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल-भाजपाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने घरातील महिलेवरच जबरदस्ती करत बलात्कार केल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *