Breaking News

Tag Archives: kapil patil

शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका

शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन टर्म (१८ वर्षे) पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन आपले तरुण …

Read More »

मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

भारत निर्वाचन आयोगाने ८ मे रोजी प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघासह राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या मतदारसंघांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मात्र शाळा १५ जून नंतर सुरू होणार असल्यामुळे सुट्ट्यांवर गेलेल्या शिक्षक मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, अब की बार भाजपा तडीपार

आगामी लोकसभा निवडमूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी एकाबाजूला निवडणूकीची तयारी जोरात केलेली असतानाच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्त पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्यावतीनं आयोजित पहिल्याच मेळाव्याला मार्गदर्शन आणि राजकिय मित्र म्हणून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी …

Read More »

कपिल पाटील यांचा इशारा: मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, प्रश्न सुटणार नाही

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही तत्काळ जातनिहाय गणना जाहीर करा आणि राज्यातील जातीय विवाद थांबवून आरक्षणाचा गुंता सोडवा अशी मागणी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव तथा आमदार कपिल पाटील यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्रही लिहिले. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ सावंतांना दिले प्रशस्तीपत्रक, तर विरोधकांच्या पोटदुखीवर … डॉ.तानाजी सावंत यांना शिक्षणमंत्री करायचे होते पण...

ठाणे जिल्हा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोले लगावले. तसेच आरोग्य विभागाने गेल्या काही काळात …

Read More »

महाराष्ट्रातील या ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान प्रथम क्रमांकाचे तीन तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी एक पुरस्कार

सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या …

Read More »

ऑटोरिक्षा चालक- मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच धोरण निश्चिती मंत्री दादाजी भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही

राज्यातील ऑटोरिक्षा चालक व मालक यांच्या सर्व समस्या, मागण्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सर्व रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य कपिल पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री भुसे यांनी सांगितले की, रिक्षा चालक बांधवांसाठी राज्य शासनाने यंदाच्या …

Read More »

जुन्या पेन्शनबाबत देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा आश्वासन, कर्मचारी, विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर… जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, …

Read More »

भाजपाच्या या केंद्रीय मंत्र्यांकडे त्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी

केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी भाजपा, महाराष्ट्रतर्फे लोकसभा प्रवास योजना आजपासून सुरू होत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मुंबईत दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, …

Read More »

महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत …

Read More »