Breaking News

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, काल विचित्र योगायोग होता अमावस्या, सुर्यग्रहण…

लोकसभा निवडणूकीची सुरुवात झाली आहे. महाविकास विकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्रित आलो आहोत. पण निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून पुढे वाटचाल करतो. देशाची राज्यघटना आणि जनतेला असलेले अधिकार अबादीत राखण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. काल जी ही चंद्रपूरात सभा झाली, त्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून टीका केली. परंतु कालचा दिवस हा सर्वात वाईट होता, कारण काल एकतर अमावस्या होती, त्यातच सुर्यग्रहण होतं पण आणि चंद्रपूरात मोदींची सभा होती असा कुत्सित टोलाही शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचा पंतप्रधान म्हणून त्या पदाची एक गरिमा असते. ती गरिमा आम्हाला काही करायची नाही. त्यामुळे ते आमच्यावर टीका करू शकतात. पण आम्ही पंतप्रधान म्हणून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. मात्र भ्रष्ट, भाकड असलेल्या जनता पार्टीचा नेता नरेंद्र मोदी म्हणून त्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना नकली आहे म्हणून नरेंद्र मोदी यांनी जी काही टीका केली. जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचची स्थापना केली. त्यावेळी कदाचित नरेंद्र मोदी हे हिमायलयात होते. मला नेमकं नाहीत नाही. पण महाराष्ट्राच्या बाहेरचा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन जर शिवसेना असली आणि नकली म्हणून सांगायला लागला म्हणजे हा कहरच झाला असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल एक विचित्र योगायोग होता, अमवस्या होती, सुर्यग्रहण होते आणि काल यांची सभा होती काय विचित्र योगायोग होता. पहिल्यांदाच असा योगायोग होता अशा सूचक शब्दात भाजपावर टीका केली. तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचा पंतप्रधान जर एकाच पक्षाचा प्रचार करायला लागला तर कसं व्हायचं असा सवाल करत त्यांनी जशी प्रचारात खासची पातळी गाठली आहे तशी खालच्या पातळीवर उतरून आम्ही टीका करणार नाही असेही यावेळी सांगितले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कालच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका केली. त्या जाहिरनाम्यात राज्यघटनेने दिलेले हक्क रोजगााच्या संधी आदी बाबत आश्वासने दिले आहेत. पण नरेंद्र मोदी यांनी त्या जाहिरनाम्याला कारण नसताना मुस्लिम लीगशी जोडण्याचा प्रयत्न केला. ज्या मुस्लिम लीगने देशाची विभाजन केले, त्याशी संबध जोडण्याचा प्रयत्न केला. मग नरेंद्र मोदी हे देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, गरिबी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आदी विषयावर का बोलले नाहीत असा सवालही यावेळी केला.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले, देशात फक्त विभाजनवादी वक्तव्य करणे आणि दोन धर्मात तेड निर्माण करणे यावर नरेंद्र मोदी यांचा भर असल्याचे दिसते असा आरोपही यावेळी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *