Breaking News

मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार संपविण्याचे कारस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देऊन हिंदुत्वाचा आधार काढून घेण्याचे कारस्थान मास्टरमाईंडने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच रचून अंमलात आणले. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तेव्हा लक्षात आले नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.

आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तरी उद्धवजींना हे कारस्थान ध्यानात येईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचननाम्याचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सत्यजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा कोल्हापूर शहराध्यक्ष राहुल चिकोडे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे व भाजपा कोल्हापूर महिला मोर्चा अध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होते. ऐक्यवादी रिपब्लिकनचे नेते दिलीपदादा जगताप यांनी यावेळी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.
शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्धवजींपेक्षा शरद पवार यांच्या जवळचे आहेत, असे आपण सतत सांगत होतो. आता संजय राऊत यांनी स्वतःच आपण शरद पवारांचा माणूस असल्याची कबुली दिली आहे. अशी जाहीर कबुली देण्यास धाडस लागते असा उपरोधिक टोलाही त्यांनी लागते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मास्टरमाईंडने एक योजना बनविली व त्यानुसार भाजपा शिवसेना यांच्या दरम्यान अंतर निर्माण करण्याची जबाबदारी एक एजन्सीला दिली गेली. दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्यासाठी रोज आगीत तेल ओतण्याचे काम त्यांनी केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. परंतु, मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार पूर्णपणे संपविण्याचा मास्टरमाईंडचा कट त्यावेळी उद्धवजींच्या ध्यानात आला नाही. तो आता तरी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या ध्यानात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवसेनेने सातत्याने जिंकलेली कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला दिली. पण निवडणुकीत हाताला मतदान करताना कोल्हापूरमधील हिंदुत्ववादी शिवसैनिक मतदार एकदा काँग्रेसकडे दिला की नंतर शिवसेना निवडणूक लढवित असताना काँग्रेसकडून परत आणता येणार नाही याची जाणीव मातोश्रीला झाली तर शेवटच्या दोन दिवसात निरोप येईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *