Breaking News

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे उतरणार कोकणातील खळ्यात

सध्या देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकापैंकी दोन राज्यातील विधानसभेच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. तर दोन राज्यातील निवडणूकाांसाठी लवकरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदारांवरील सुनावणीला वेग दिला. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका लोकसभेच्या निवडणूकांसोबत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्यापासून दोन दिवस कोकणच्या खळ्यात उतरणार असल्याची माहिती पुढे आली.

खळा बैठक ही एक आगळीवेगळी संकल्पना आहे. कोकणातील खळा हा घराशी निगडित अनेक अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार असतो. त्याच खळ्यामध्ये गुरूवार २३ नोव्हेंबर आणि शुक्रवार २४ नोव्हेंबर असे दोन दिवस आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे हे आपल्या घरी येऊन आपल्याशी संवाद साधणार असल्याने कोकणातील शिवसैनिकांमध्ये चैत्यन्यांचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी होणारा हा संवाद महत्वाचा ठरणार आहे. स्थानिक प्रश्नांबद्दलही यावेळी चर्चा होऊ शकते. कोकणभूमी ही सुरूवातीपासूनच शिवसेनेच्या सोबत राहिली आहे. दोडा मार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, खेड, महाड, नागोठणे आदी ठिकाणी या खळा बैठका होणार आहेत.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *