Breaking News

Tag Archives: आमदार

आमदार रविंद्र वायकर शिंदे गटातः मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्याचे स्पष्टोक्ती

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटातील उर्वरित आमदार खासदारांना शिंदे गटात ओढण्याचे काम भाजपाच्या त्या यंत्रणांच्या मार्फत सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. त्या अनुषंगाने ठाकरे गटाचे निष्ठावान आमदार असलेले रविंद्र वायकर यांनी त्यांच्या कथित हॉटेलवर पडलेल्या ईडी आणि पोलिसांच्या पडलेल्या धाडींना कंटाळून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेतृत्वाखालील गटात …

Read More »

आमदार गणपत गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच आज मी गुन्हेगार…

आतापर्यंत शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. परंतु शुक्रवारी रात्री उल्हासनगर मधील हिल पोलिस स्थानकात स्थानिक भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला शिंदे गटाच्या शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गणपत …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… निधी देण्यासाठी पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही न देणे …

Read More »

रविंद्र वायकर यांच्या घरी ईडी, तर राजन विचारे यांच्याकडे आयकर विभाग

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत महाराष्ट्रातील जवळपास ४४ आमदारांनी एका फटक्यात पक्ष प्रमुखाला न विचारता आणि घटनात्मक ( शिवसेनेच्या नव्हे राज्यघटनेतील) तरतूदींना बाजूला सारत केंद्रातील महाशक्तीच्या (भाजपा-अमित शाह-नरेंद्र मोदी) च्या पाठिंच्या बळावर महाराष्ट्रात राज्य सरकार स्थापन करत जवळपास २ वर्षे झाले चालविलेही. या सगळ्या घडामोडीत पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यास …

Read More »

आरोग्य व्यवस्थेवरून आमदार प्रणिती शिंदे आणि मंत्री सावंत यांच्यात खडाजंगी

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रूग्णालयांबरोबरच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात येत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडून ठोस उत्तर मिळण्याऐवजी अशा गोष्टींना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा सध्या …

Read More »

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे उतरणार कोकणातील खळ्यात

सध्या देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकापैंकी दोन राज्यातील विधानसभेच्या निवडणूका पूर्ण झाल्या आहेत. तर दोन राज्यातील निवडणूकाांसाठी लवकरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदारांवरील सुनावणीला वेग दिला. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका लोकसभेच्या निवडणूकांसोबत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच …

Read More »

कपिल पाटील यांचा इशारा: मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, प्रश्न सुटणार नाही

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही तत्काळ जातनिहाय गणना जाहीर करा आणि राज्यातील जातीय विवाद थांबवून आरक्षणाचा गुंता सोडवा अशी मागणी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव तथा आमदार कपिल पाटील यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्रही लिहिले. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी …

Read More »

प्रकाश सोळंके यांचा आरोपः बंगला, गाड्या जाळण्यामागे मराठा नव्हे तर राजकीय विरोधक अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंकेचा स्थानिक प्रतिस्पर्ध्यावर आरोप

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला आणि गाड्या जाळण्यामागे मराठा आंदोलक नसून यात राजकीय विरोधक तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार सोळंके यांनी आज येथे केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची होती अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली . आमदार प्रकाश …

Read More »

प्रविण दरेकर यांनी दिला खोचक सल्ला, संजय शिरसाटांनी क्षमतेत बोलावे संजय शिरसाट यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे विधानावरून सल्ला

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चांगलेच कान टोचले आहेत. संजय शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत बोलावे, असा सल्ला दरेकर यांनी दिला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज वक्तव्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात चांगले काम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दम, पाच वेळा सफाई झाली पाहिजे; नसेल तर नोटीस देऊ मुख्यमंत्र्यांची कुर्ल्याच्या एसआरए वसाहतीला अचानक भेट

स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. कुर्ला येथील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची …

Read More »