Breaking News

आमदार रविंद्र वायकर शिंदे गटातः मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्याचे स्पष्टोक्ती

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटातील उर्वरित आमदार खासदारांना शिंदे गटात ओढण्याचे काम भाजपाच्या त्या यंत्रणांच्या मार्फत सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. त्या अनुषंगाने ठाकरे गटाचे निष्ठावान आमदार असलेले रविंद्र वायकर यांनी त्यांच्या कथित हॉटेलवर पडलेल्या ईडी आणि पोलिसांच्या पडलेल्या धाडींना कंटाळून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला.

रविंद्र वायकर यांचा शिंदे गटातील प्रवेश सोहळा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी आयोजित करण्यात आला.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रविंद्र वायकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे खासदार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, इथे बसलेले सर्व उपस्थित बंधू-भगिणी मातांनो, खरं म्हणजे मी गेली ५० वर्षे शिवसेनेत काम केलं आहे. १९७४ ची पहिली जोगेश्वरीतील दंगल, त्यावेळपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जे पडेल ते काम शिवसेनेचं केलं. चार वेळा नगरसेवक, चार वेळा स्टँडिंग कमिटी, तीन वेळा आमदार हे पर्यायाने आलं. पण आता ज्यावेळेला मी इथे पक्षप्रवेश करतोय त्यामागचं कारण वेगळं आहे असे सूचक वक्तव्यही यावेळी केलं.

पुढे बोलताना रविंद्र वायकर म्हणाले की, पहिले तर कोविड होतं त्यावेळी कामं झाली नव्हती. पण आता जी कामे आहेत, प्रामुख्याने आरेच्या बाबतीत पाहाल, १७३ कोटी रुपये मला आरेच्या रस्त्यासाठी पाहिजेत. लोकं रडत आहेत. आरेबाबत लोकं रडत आहे की, आमच्याकडे ४५ किमीचे रस्ते होणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रॉयल पंप सारख्या परिसरात अत्यंत उत्तम पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही. अशावेळेला धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं महत्त्वाचं असतं. अशावेळी धोरणात्मक निर्णय बदलले नाहीत तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही असेही सांगितले.

रविंद्र वायकर पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या इथे पीएमजीबी कॉलनी आहे. या कॉलनीसाठी मी पत्रव्यावहार करायचो. त्या १७ बिल्डिंग पडल्या तर मग काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे. सर्वोदय नगरचा प्रश्न आहे. एनडी झोनचा प्रश्न आहे. धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाही. सत्तेत असताना आपण धोरणात्मक निर्णय सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं काम सुरु आहे. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे. हे प्रश्न सोडवले नाहीत तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही अशी भूमिका वायकर यांनी मांडत शिंदे गटातील प्रवेशाचं समर्थन केले.

दरम्यान मागील दोन-चार वर्षापासून अनेक वेळा वायकर हे तपास यंत्रणाच्या रडारवर आल्याने चर्चेत आले. यामध्ये कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप, तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असलेली चौकशी आणि ईडीकडून सुरु असलेली चौकशी यामुळे वायकर चर्चेत होते. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.

याशिवाय मुंबई महापालिकेकडून रितसर करारनामा आणि परवानगी घेऊन जोगेश्वरी येथील मोकळ्या भूखंडावर एक पंचतारांकित हॉचेल उभारले. मात्र या हॉटेल उभारणीसाठी लागणारा पैसा हा मनी लॉडरिंगच्या माध्यमातून उभारण्यात आल्याची आणि मुंबई महापालिकेकडून विना परवाना मोकळ्या भूखंडावर हॉटेलची उभारणी केल्याचा आरोप भाजपाच्या काही नेत्यांनी केल्यानंतर रविंद्र वायकर यांच्या विरोधात ईडीने कारवाई सुरु केली. त्यामुळे अखेर रविंद्र वायकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानुसार रविंद्र वायकर यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *