Breaking News

आमदार गणपत गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच आज मी गुन्हेगार…

आतापर्यंत शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. परंतु शुक्रवारी रात्री उल्हासनगर मधील हिल पोलिस स्थानकात स्थानिक भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला शिंदे गटाच्या शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.

गणपत गायकवाड यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना झालेल्या घटनेसंदर्भात विचारले असता गणपत गायकवाड म्हणाले की, सदरची जागा मी १० वर्षापूर्वी मुळ जागेच्या मालकाकडून खरेदी केली. त्याला दोन-तीनवेळा पैसे दिले. तरीही संबधित जागेचा मालक खरेदी खतावर सही करण्यासाठी येत नव्हता. अखेर याप्रकरणी न्यायालयात धाव घेतल्यानंतर अखेर न्यायालयाने आमच्याबाजूने निकाल दिल्यानंतर सदरची जागा आमच्या नावे करण्यात आली.

तसेच गणपत गायकवाड म्हणाले की, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक महेश गायकवाड हे सातत्याने आमचे जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. यासंदर्भात मी महेश गायकवाड यांना सांगितले होते की जर जमिन तुमची असेल तर त्या संदर्भात न्यायालयात जा न्यायालयाने जर सांगितले की सदरची जागा त्यांच्या मालकीची आहे. तर आम्ही तुमची जागा तुम्हाला परत देऊ. तरीही ते आमच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. यासंदर्भात माझा मुलगा पोलिस ठाण्यात दाद मागण्यासाठी गेला होता. परंतु पोलिसांसमोरच माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच महेश गायकवाड यांनी आपल्या समर्थकांना सोबत घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी माझ्या मुलाला धक्काबुक्की पोलिस ठाण्यात केल्याने अखेर मी गोळीबार केल्याची कबुली देत पाच गोळ्या झाडल्याचे सांगितले.

महेश गायकवाड यांच्याबरोबरील जमिनीवरील वादाची माहिती मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती का असे विचारले असता गणपत गायकवाड म्हणाले की, या वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली होती. परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि यांच्याकडून आमच्या आमदार फंडातून झालेल्या कामाच्या ठिकाणीही घुसखोरी करत त्यांचे बॅनर जबरदस्तीने लावत होते. तसेच त्यांच्या समर्थकांची दादागिरीही वाढली होती. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आमच्यासारख्यांकडून कोट्यावधी रूपये खाल्ले पण आज ते आमच्यावरच दादागिरी करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करत भाजपासोबत गेले. ते भाजपासोबतही गद्दारी करतील अशी भीती व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी फक्त पैसा कमवत जिकडे जिकडे गुंडांनाच पोसले. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी पोलिस ठाण्यात गोळीबार केला. तसेच त्यांच्यामुळेच मी आज गुन्हेगार झालो असून त्यांचा आपणाला कोणताही पच्छाताप वाटत नसल्याचेही सांगितले.

दरम्यान, गोळीबार पोलिस ठाण्यात घेतल्याने पोलिसांनी तात्काळ पुढील कारवाई करत गणपत गायवाड यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर महेश गायकवाड यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनप्रकरणी सरकारला निर्देश

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ द्यावा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *