Breaking News

प्रविण दरेकर यांनी दिला खोचक सल्ला, संजय शिरसाटांनी क्षमतेत बोलावे संजय शिरसाट यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे विधानावरून सल्ला

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चांगलेच कान टोचले आहेत. संजय शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत बोलावे, असा सल्ला दरेकर यांनी दिला.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज वक्तव्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात चांगले काम करत असून यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावून काम करावे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राज्यातील जबाबदारी सोपवावी असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले असताना भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी मात्र संजय शिरसाट यांना खोचक सल्ला दिला.

आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जावे की महाराष्ट्रात राहावे हे सुचविण्याचा अधिकार संजय शिरसाट यांना नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावं, मी औकातीत बोलत नाही. कारण ते आपल्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत. आमचे दिल्लीचे नेतृत्व सक्षम आहे. देवेंद्रजींनी महाराष्ट्रात राहायचे की दिल्लीत जायचे ते ठरवतील. परंतु आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्रजी महाराष्ट्रातच हवेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचीही इच्छा आहे देवेंद्रजींनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, महाराष्ट्राला विकासाकडे न्यावे.

आज महाराष्ट्रावर अनेक संकटे आहेत. एकत्रितपणे सरकारने सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. अशावेळेला महायुतीतील वातावरण कलुशीत होणार नाही याची काळजी महायुतीतील नेत्यांनी घेतली पाहिजे व रोज टीव्हीवर येऊन बोलणाऱ्यांनी तर घेतलीच पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला आहे.

मदारी म्हणजे उद्धव ठाकरे

दरेकर यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, मदारी म्हणजे उध्दव ठाकरे व दोन माकडं म्हणजे स्वतः संजय राऊत व दुसरे आदित्य ठाकरे ! कारण त्यांच्या “मरकटलीला” व “माकडकथा” रोज सकाळी माध्यमांसमोर सुरू असतात.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *