Breaking News

Tag Archives: pravin darekar

कोरोनामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातील किमान एक अधिवेशन नागपूरात घेतले जाते. त्यानुसार नियोजित हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाय येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नियोजित नागपूरचे अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. …

Read More »

अर्णव गोस्वामीवरील कारवाईने सत्ताधारी-विरोधक आमने सामने भाजपाचे ठिकठिकाणी मोर्चे

मुंबईः प्रतिनिधी रिपब्लिक टि.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांना आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आज सकाळी अटक करण्यात आली. या अटकेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र राज्यात पाह्यला मिळाले. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर काँग्रेसच्या मदतीने आणीबाणी आणत असल्याचा आरोप शिवसेनेवर करत महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या सात महिन्यातील कार्यकर्तृत्वाला असाही उजाळा ‘जनसेवक’ विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या कठीण प्रसंगी कोविड सेंटरला दिलेल्या भेटी तसेच निसर्ग चक्रिवादळाची परिस्थिती असो वा महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे प्रसंग पण प्रत्येक संकटाच्या काळात केवळ स्वस्थ बसून न राहता जनतेमध्ये प्रत्यक्ष फिरून व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम कोविड योध्दे देवेंद्र फडणवीस यांनी ख-या अर्थाने केले. देवेंद्रजी …

Read More »

फडणवीस, दरेकरांचा दौरा पवारांच्या एका बालेकिल्ल्यातून सुरु होवून दुसऱ्यात संपणार दौऱ्याची सुरुवात बारामतीतून तर शेवट साताऱ्यात

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विरूध्द शरद पवार विरूध्द भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर हे जोडीने जाणार आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात …

Read More »

मदन शर्मा हे नौदलातील कि मालवाहतूक जहाजावर काम करणारे ? सोशल मिडियावरील माहितीने खळबळ

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक कार्टून व्हॉट्सअॅपवरून पाठविल्यामुळे शिवसैनिकांनी मारहाण प्रकरण केलेले मदन शर्मा हे संरक्षण विभागाच्या नेव्ही अर्थात नौदलातील अधिकारी नव्हे मर्चंट नेव्ही अर्थात मालवाहतूक जहाजावरील अधिकारी असल्याची माहिती सोशल मिडियातून फिरत आहे. तर दुसऱ्याबाजूला त्याचे मिळालेल्या ओळखपत्रावरून ते सैन्य दलात असल्याची माहिती पुढे येत …

Read More »

निवृत्त नौदल अधिकारी शर्मा मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी भाजपा आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाविरोधात कारवाई करण्याचे नाटक ठाकरे सरकार कडून करण्यात आले होते. या विरोधात अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन …

Read More »

सरकारी कंपनी सांगते कोरोना चाचणी ७९६ रू.त करा मात्र राज्याने १२०० रू. दर लावला खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने राज्याच्या आरोग्य खात्याने केली सुमारे २७० कोटींची लूट

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात जनतेच्या पैशाची कोटयावधी रुपयांची लूट केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. खाजगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी आज केली. कोरोनाच्या काळामध्ये जनतेला …

Read More »

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …

Read More »

भाजपाची पुन्हा राज्यपालांकडे धाव…. बिहारसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात तक्रार यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याऐवजी मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली

मुंबई: प्रतिनिधी धार्मिक स्थळे त्वरित उघडा, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्वरित दिलासा द्या, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दल भाजपाच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा राजभवनावर जात राज्य सरकारच्या विरोधात तक्रार केली. मात्र भाजपाच्या या शिष्टमंडळात यंदा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नव्हते. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा …

Read More »

भाजपाच्या ‘रक्षक बंधन’ उपक्रमाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ 'एक घर दोन राख्या' चे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष मुंबई आयोजित “रक्षक बंधन” या उपक्रमाचा आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना हेदेखील उपस्थित होते. “रक्षक बंधन” कार्यक्रमांतर्गत कोविड योद्धे डॉक्टर्स, वैद्यकीय …

Read More »