Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे भारतात परतताच म्हणाले, ३४ वर्षाची माझी इमेज… संजय राऊत यांच्या फोटो ट्विटवरून दिले प्रत्युत्तर

मागील दोन तीन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चीन मधील मकाऊ दौऱ्यातील एक फोटो ट्विट करत एकच खळबळ उडवून दिली. तसेच या दौऱ्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचे २२ फोटो आणि १० व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. त्यावर भाजपाने शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो ट्विट करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

अखेर संजय राऊत यांनी भाजपाच्या आरोपांना प्रत्तुतर देत मी कोणाचेही नाव घेतले नाही. तसेच कोणत्याही पक्षाचा दाखला दिला नसताना भाजपाने ट्विट करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे जूनेच फोटो ट्विट का केले असा सवाल करत भाजपाला केला. संजय राऊत यांनी फोटो ट्विट केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ दौऱ्यातील कुटुंबियासोबतचे फोटो ट्विट करत आपण मकाऊमध्येच आहोत. मात्र कुटुंबियांसोबतच असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भारतात परतताच संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोबाबत विचारले असता म्हणाले, माझी ही इमेज ३४-३७ वर्षाच्या राजकिय मेहनतीतून उभी राहिली आहे. पण कोणी एखाद्या फोटोच्या आधारे तो इमेज बिघडविण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचे प्रयत्न त्यांनाच लखलाभ असे सांगितले.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माझ्या सुनेने आणि मुलीने तीन दिवसांचा वेळ काढून या दौऱ्याचे नियोजन केलं होत. आम्ही हाँगकाँगला गेलो होता. सगळं काही सुरळीत सुरु होतं. त्यानंतर वैयक्तिक जीवन डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झाला. असे प्रयत्न चुकीचे वाटतात.

तसेच चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले, शिवसेना-भाजपा युती असताना आम्ही दोघांनी जवळपास ४ वेळा निवडणूका एकत्र जिंकल्या. त्यामुळे शिवसेनेतील अनेक नेते मला ओळखतात. विधिमंडळातील अनेक मित्र आहेत. ३४ वर्षे राजकिय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना अशा एखाद्या फोटोच्या आधारे इमेज खराब करण्याचा प्रयत्न त्यांनाच लखलाभ असे सांगत संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सगळ्यांनाच माहित आहे. हाँगकाँग आणि मकाऊला गेल्यानंतर कॅसिनोला ओलांडूनच पुढे जावं लागतं.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *