Breaking News

विजय वडेट्टीवार यांची टीका, सरकारचे परीक्षार्थींना सबुरीचे गाजर

राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडल्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले “सबुरी” चे गाजरच असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार पदांची भरती पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यातील तरुणांना दिले होते. तलाठी पद भरती परीक्षा ,पशुसंवर्धन, सहकार विभाग , वन विभाग, अर्थ सांख्यिकी विभाग तसेच कृषी विभागातील पद भरती परीक्षा भरती पूर्ण करणे तर सोडा सरकारने अजून परीक्षांचे निकाल जाहीर केलेले नाही असा आरोप केला.

राज्य सरकारवर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, निकाल जाहीर न झाल्याने परीक्षार्थी उमेदवार मानसिक दडपणातून जात असून, सरकारच्या इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले “सबुरी चे गाजर” आहे अशी केली.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *