Breaking News

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी हिटलरसारखे सतत इव्हेंट करतात बाळासाहेब ठाकरेंनाही आवडायचे हिटलर

पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीच्या सत्तास्थानी हिटलर आला. त्यानेही आपले प्रसिध्दी आणि संघटनेचे आकर्षण लोकांमध्ये सातत्याने निर्माण व्हावे या उद्देशाने सतत इव्हेंट करायचा. नेमकी तीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असून तेही सातत्याने हिटलरप्रमाणे इव्हेंट करत असल्याचे सांगत मोदी हिटलरला फॉलो करत असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेशिवाय सोशल मीडिया पुढे जाऊ शकत नाही. बाळासाहेब आमचे फेस होते, त्यावेळी सोशल मीडिया कुठे होती? हिटलर सगळ्यांना प्रिय होता, बाळासाहेबांना देखील आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरला फॉलो करतात. ज्या प्रकारचे इव्हेन्ट हिटलर करायचा, त्याचप्रकराचरे इव्हेन्ट आता मोदी करत आहेत. मी टीका करत नाही असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

आपलं सामना वर्तमानपत्र मुंबईत महाराष्ट्रात आहे. मात्र त्याचा अनुवाद देशातील सगळ्या भाषेत होते असे सांगत लोकांना फारसं न सांगता अचूक फोटातूनही सांगता आलं पाहिजे किंवा काहीही न लिहिताही फक्त फोटोतून योग्य तो संदेश गेला पाहिजे. पूर्वीच्या काळी कुठे होता सोशल मिडीया पण शिवसेनेची भूमिका सर्वदूर जात जायची असेही ते म्हणाले.

मी रोज सकाळी बोलतो पण माझा नाईलाज आहे. नाहीतर पक्षाचा दिवसभर अजेंडा सेट होणार नाही. आपल्या चेहऱ्यावर तणाव दिसणं हे आपला पहिला पराभव असेल असे सूचक वक्तव्य करत ते म्हणाले, राहुल गांधीना फेल करण्यात जर कोणाचा हात असेल तर भाजपाच्या सोशल टीमचा आहे. त्यांनी राहुल गांधीं बद्दल पप्पू पप्पू असं सर्वत्र पसरवलं, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे मौनी बाबा आहेत असं दर्शवलं. भाजपा सर्वात जास्त पैसा आयटी सेलवर खर्च करते. शिवसेनेवर बोलायला तर माणसं ठेवली आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सोशल मिडीयाचा वापर करून आपल्याला सर्वांपर्यत पोहचायला पाहिजे. शिवसेनेची भूमिका आपल्याकडून लोकांसमोर मांडली गेली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.