Breaking News

पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर शिवसेना नेते अर्जून खोतकरांनी दाखविली “ही” तयारी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण पण निर्णय नेतेच घेतील

राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकींचा धुराळा उडायला सुरुवात झाली. चर्चेत असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या भाजपा उमेदवारांच्या यादीत नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झाल्याने औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर त्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष आहे.

अशातच पंकजा मुंडे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले शिवसेना नेते अर्जून खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाबाबत बोलणार असल्याचं वक्तव्य केले. ते जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
अर्जून खोतकर म्हणाले, पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी त्यात नाक खुपसण्याचं काहीही कारण नाही.

परंतू बहीण म्हणून पंकजा मुंडेंबाबत वाईट वाटतं. एवढं मोठं घराणं असून या संधीपासून दूर राहिलं याचं वाईट वाटतं. त्यांचा विचार व्हायला हवा होता, सामान्य जनतेलाही तसंच वाटतं. अर्थात हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बहीण भाऊ म्हणून आमच्या ज्या काही अंतर्गत गोष्टी होतील त्यात आम्ही बोलू. पंकजा मुंडे यांच्या बोलताना विषय निघाला तर त्यांनी शिवसेनेत यावं याबाबत बोलेन. मात्र, त्या भाजपात ज्या पातळीवर काम करतात त्यावरून त्या असा काही विचार करतील असं वाटत नसल्याचेही ते म्हणाले.

पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी औरंगाबादमधील भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावर अर्जून खोतकर यांनी मला याबाबत माहिती नसल्याचे सांगत हिंसेचं समर्थन कुणीही करणार नाही असं मत व्यक्त केलं. तसेच यावर अधिक बोलणं टाळले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *