Breaking News

१५ जूनपासून शाळा सुरु राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जून पासून विद्यार्थी १५ जूनपासून शाळा सुरु

मागील दोन वर्षापासून राज्यात कोविडमुळे शालेय शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. त्यामुळे जवळपास १ ली ते १० पर्यंतच्या विद्याथ्यांच्या परिक्षाही घेता आल्या नाहीत. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विस्कळीत झालेले शाळांचे वार्षिक वर्ष नियोजित पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने १३ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला असून १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी माहिती दिली.

राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या १३ जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, १५ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होवून चौथा सोमवार, २७ जून २०२२ रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१३ ते १४ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रादूर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन करणे याचे नियोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत २४ ते २५ जून २०२२ रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येवून २७ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसेच यापुढे देण्यात येणारे निर्देश / सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/ पालकांचे कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने प्रबोधन/ उद्बोधन करण्यात यावे, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत.

यंदाच्या वर्षापासून शैक्षणिक वर्ष सुरळीत होणार असल्याने आता विद्यार्थी शाळांमध्ये येतील त्याचबरोबर त्यांच्या परिक्षा होवून त्यांच्या बुध्दीला चालनाही मिळण्यास मदत होईल अशी आशा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्यही उतरल्या निवडणूकीच्या रिंगणात

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी २९ एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *