Breaking News

बार्टीमार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यी संख्येत १०० ने वाढ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक २०० विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या १०० ने वाढवून ३०० करण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

दरवर्षी बार्टी मार्फत विशेष चाचणी परिक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या २०० विद्यार्थ्यांना दिल्ली येथे मोफत प्रशिक्षणासाठी निवडले जाते. दिल्ली येथे नामांकित प्रशिक्षण केंद्रात प्रवेश तसेच सदर उमेदवारांना निवास व भोजन व्यवस्था देखील बार्टी मार्फत पुरवली जाते.

मागील दोन वर्षात लॉकडाऊन काळात देखील उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत बार्टी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. बार्टीचे २०२० साली ९ तर २०२१ साली ७ उमेदवार यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी बनले आहेत.

याचाच विचार करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशिक्षणासाठी निवड होणाऱ्या विद्यार्थी संख्येत १०० ने वाढ केली असून, यावर्षी तब्बल ३०० विद्यार्थी यूपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण घेणार आहेत.
या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

Check Also

घर कामगार महिलाच्या समस्यांसाठी “श्रम सन्मान” २३ मार्च शहिद दिनी होणार आझाद मैदानावर होणार सभा

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ( जी.डी.पी.) ५०% टक्यांची भर घालणा-या असंघटित कामगारां मध्ये सर्वात मोठे …

Leave a Reply

Your email address will not be published.