राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, जनावरे आणि जनजीवन यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या संसारावर संकट ओढवले आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून या संकटाकडे पाहून शेतकऱ्यांना तातडीची आणि दीर्घकालीन मदत द्यावी, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वास्तव पाहणी केली जावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
शरद पवार बोलताना म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भासारख्या कमी पाऊस पडणाऱ्या भागांत यंदा अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांचे प्रमुख आधारपीक असून या पिकाची वाढ सुरळीत झाली होती. मात्र, सलग पाच दिवस वाफ्यात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर पिके कुजून गेली. काही भागात कापूस आणि इतर खरीप पिकेही उध्वस्त झाली आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काहीही उत्पादन आले नाही. आपण दुष्काळ पाहिला आहे, पण अशी अतिवृष्टी याआधी कधी पाहिली नव्हती. त्यामुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली असल्याबाबतही चिंता व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले की,यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात अभूतपूर्व पाऊस पडलाय.राज्यात अतिवृष्टी झाली, त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झालेला आहे दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्याचा प्रचंड मोठा परिणाम शेतकऱ्यांवर झालाय. सोयाबीनच भरवश्याचं पीक आहे, मात्र पाण्यामुळे सोयाबीनची पीक कुजून गेली, त्याच्यापासूनचं जे उत्पादन होतं शेतकऱ्याच्या हातात नाही, त्यामुळे शेतकरी उधवस्त झाले. मी दुष्काळ पाहिला मात्र अशी अतिवृष्टी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यात कामी पाऊस असतो त्या जिल्ह्यात पाऊस पडतोय. सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी नगर या सगळ्या भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच अतोनात नुकसान झाले आहे. या सगळ्याठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला साहाय्य करण्याची योजना आहे. राज्यामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी केंद्र सरकारकडून अशा परिस्थितीत मदत करायला जी योजना आहे, त्याचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने पंचनामे करुन घेणे आणि तातडीने त्यांना नुकसान भरपाई देणे, या दोन गोष्टी करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, ही नुकसान भरपाई कशाची असते, एक पीक, दोन गुरेढोरं आणि तिसरं जमीन वाहून गेली. पीक वाया गेलं तर फक्त त्यावर्षी नुकसान होते. पण जमिनीवरची माती वाहून गेली तर त्यामधून उत्पादन येण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे यावेळची मदत फक्त पंचनामे करुन, पीक गेलं म्हणून चालणार नाही. पिकासाठी मदत द्यावीच लागेल. पण जमिनीसाठीही मदत करावी लागेल. त्यासोबत पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यासाठीही मदत करावी लागेल. अनेक ठिकाणी तक्रारी आहेत, गुरं वाहून गेली. या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकारने बघितले पाहिजे, हे काम सरकारने गतीने केले पाहिजे. पहिल्यांदा पंचनामे, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, पिकांची पाहणी करणे आणि वास्तव पंचनामे करणे, गरजेचे आहे. यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरुपाची मदत ही अभूतपूर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. आम्ही अपेक्षा करतो, राज्य सरकार अत्यंत याचा गांभीर्याने विचार करेल अशी आशाही यावेळी व्यक्त केली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, काही लोक फिल्डवर जाऊन पाहणी करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांची पाहणी झाल्यावर तातडीची मदत करणे गरजेचे आहे. शेतकरी राजाला पुन्हा एकदा कसा उभा करायचा, या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावे. हवामान खात्याने पुढील चार दिवस पाऊस आहे. यावेळचं वैशिष्ट असे आहे की, हवामान खाते जे जे सांगतंय , ते ते घडतंय अगदी सुरुवातीपासून. मे महिन्याच्या कालखंडातही पाऊस पडला. सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो. तेव्हापासून आतापर्यंत हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावध केले आहे. त्यांची अंदाजाची माहिती आहे, त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे असे आवाहनही यावेळी केले.
शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की,जमिनी वरील माती वाहून गेली तर कायच नुकसान होत त्यामुळे पीक गेलं म्हणून चालणार नाही, पिकांसोबत जमीन आणि पाणंद रस्ते यांचे पंचनामे करावे लागतील. गुरं देखील वाहून गेली आहेत यांचे पंचनामे गतीने करावे लागतील. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन तातडीची आणि कायमस्वरूपीची मदत शेतकऱ्यांना देण आवश्यक आहे. राज्य आणि केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमध्ये साहाय्य करण्याची योजना आहे. शेतकरी राजा, पुन्हा एकदा कसा उभा करायचा याचा प्रयत्न केला पाहिजे. हवामान खात्याने सांगितलं पुढील ४ दिवस पाऊस आहे , पहिल्यांदा असं घडतेय हवामान खाते जे जे सांगतेय ते ते होतंय, असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya