Breaking News

राजकारण

नवाब मलिकांची मुलगी म्हणाली डॉ.लांबेची नियुक्ती फडणवीसांनीच केली: हा घ्या पुरावा फडणवीस गेले बॅकफुटवर

संध्याकाळी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर करत राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या वक्फ बोर्डावर दाऊद इब्राहीमच्या गँगशी संबधित व्यक्तीच्या नातेवाईकाची वर्णी लावल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आणली. तसेच त्या व्यक्तीकडून स्वतःहून फोनवरील संभाषणात सांगत असल्याचा दावाही केला. त्यावर नवाब मलिकांची मुलगी तथा राष्ट्रवादी …

Read More »

फडणवीसांनी फोडला दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्बः दाऊदचे नातेवाईक या बोर्डावर अर्थसंकल्पिय अधिवेशनातील दुसरा बॉम्ब

अर्थसंकल्पिय चर्चत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण संपविता संपविता दुसरा एक पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडत अल्पसंख्याक विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वक्फ बोर्डावरील सदस्य हे अडंरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचे नातेवाईक असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत डॉ.मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्या फोन संभाषणच …

Read More »

आणि अर्थसंकल्पावरून फडणवीसांनी केले अजित पवारांचे कौतुक विधानसभेत अर्थसंकल्पिय चर्चेवेळी केले कौतुक

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पातील तरतूदींवरून आणि त्यातील युनिक कल्पनांवरून विरोधकाकडून अर्थमंत्र्यांचे कौतुक केल्याची घटना घडली आहे. वास्तविक पाहता राजकिय वर्तुळात त्यातही विशेषतः सत्ताधारी आणि विरोधकांकडून एखाद्या तरतूदीवरून किंवा बाबीवरून विधिमंडळाच्या सभागृहात कौतुक करण्याची घटना तुरळकच असते. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. अजित …

Read More »

फडणवीस म्हणाले, प्रश्न बदलणाऱ्यांना माहित नाही मी कोणत्या घरातून आलोय एसआयडी रिपोर्ट लिक प्रश्नी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर फडणवीसांचे सावध प्रतिक्रिया

राज्य गुप्तचर विभागाच्या अहवाल फुटीवरून भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि ॲड. आशिष शेलार यांनी स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिलेले संयत उत्तर आपल्याला आवडले. मी तुमच्या हेतूबद्दल अविश्वास दाखवित नाही. पण पाठविलेली प्रश्नावली आणि प्रत्यक्ष विचारलेले …

Read More »

गृहमंत्री वळसे-पाटील यांची स्पष्टोक्ती, पोलिसांनी केंद्रीय गृह सचिवांनाही पत्र पाठवलयं फडणवीस यांच्यावरील स्थगन प्रस्तावाला गृहमंत्र्यांचे उत्तर

राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल फोडल्यावरून मुंबई सायबर पोलिसांनी पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने जे काही झालं ते योग्य नव्हतं. यापूर्वी फडणवीस यांना पाच ते सहा वेळा पोलिसांनी प्रश्नावली पाठविली होती. परंतु काही कारणास्तव फडणवीसांनी प्रश्नावलीला उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या अधिकारात हजर राहण्यासंदर्भात पत्र पाठविले. इतकेच नव्हे तर केंद्रीय गृह सचिवांना …

Read More »

अजित पवार म्हणाले, चार-चार चौकशा झाल्यापण हाती काहीच नाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही माहिती देणार

राज्यातील सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आतापर्यंत चार वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यातील दोन चौकश्या या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात तर दोन चौकशा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना झाल्या. मात्र या चौकशांमधून हाती आलेले नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री …

Read More »

काँग्रेसच्या बैठकीत झाला “हा” निर्णय: मात्र जी २३ नेत्यांनी केली ही मागणी चार तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत निर्णय

देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक बोलाविली. जवळपास चार तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत पुन्हा एकदा प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसने विश्वास दाखविला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पुढील वाटचाल करणार असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी …

Read More »

नाना पटोलेंनी केलेली “ती” मागणी राष्ट्रवादीच्या या मंत्र्याने पुन्हा केली गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बॅलेट पेपर मतदानाची मागणी

मागील तीन टर्मपासून देशातील सर्वच निवडणूका ईव्हीएम मशिन्सद्वारे घेण्यात येत आहेत. मात्र या ईव्हिएम मशिन्सच्या माध्यमातून घेतलेल्या निवडणूकीत फक्त भाजपाचा विजय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची केलेली मागणी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा …

Read More »

मंत्री भुजबळ म्हणाले, जोपर्यंत शरद पवार यांची शक्ती सरकारच्या मागे तोपर्यंत… राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त राज्य सरकार संपुर्ण राज्यात विविध कार्यक्रम राबवणार

राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी सरकार आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जाणारे सरकार आहे. जो पर्यंत या सरकारच्या पाठीमागे शरद पवार नावाची शक्ती उभी आहे, तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला काहीही होणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, पण फडणवीस पोहोचलेले… अधिवेशनाला आणखी नऊ दिवस शिल्लक

देशातील लोकशाही संपलेली नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेने दोन दिवस सुरु असलेला तमाशा पाहिलेला आहे. ज्या माणसाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील घोटाळ्याची माहिती गोळा केली आणि केंद्रीय गृहसचिवांना दिली त्यांनाच तुम्हाला माहिती कुठून मिळाली असे विचारले जात आहे. तुम्हाला याची माहिती मिळालेली नाही ते आधी बघा. विरोधी पक्षांना याचे स्वातंत्र्य आणि अधिकार …

Read More »