Breaking News

राजकारण

आता महसूल मंत्री थोरातही कोरोना पॉझिटीव्ह फेसबुकवरून आणि ट्विटरवरून दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनापासून राज्याचे मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण वाढलेले असून या यादीत आता राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मंत्री थोरात यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून दिली. ऐन हिवाळी अधिवेशन सुरु असताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना …

Read More »

नितेश राणेंना न्यायालयाचा दिलासा नाहीच, आता उच्च न्यायालयात धाव नितेश अद्यापही अज्ञातवासात

मराठी ई-बातम्या टीम संतोष परब हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देत सलग दोन दिवस सुणावनीनंतर आज अखेर नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या मोबाईल जप्त करून अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. न्यायालयाच्या या निकालामुळे राणे कुटुंबियांना …

Read More »

कबुलीनंतरही शिवसेनेला पवारांबद्दल प्रेम असेल तर… भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला टोला

मराठी ई-बातम्या टीम भाजपा आणि शिवसेनेत अंतर वाढविण्याच्या कामाची शरद पवारांनी जाहीर कबुली दिली आहे. त्यानंतरही शिवसेनेला पवारांबद्दल प्रेम असेल तर ते त्यांना लखलाभ होवो, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावत आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ सुरु असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. गेल्या दोन …

Read More »

वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांची मोठी विधाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडून लॉकडाऊनचे संकेत

मराठी ई-बातम्या टीम मागील आठवडाभरात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सुचक वक्तव्य करत लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे वक्तव्य केले आहे. राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना विचारले असता, नागरीकांकडून अद्यापही ठिकठिकाणी गर्दी करण्याचे …

Read More »

पवारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,… विश्वास कोण ठेवणार? राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत मोदींशी चर्चा झाल्याच्या पवारांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्यात सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनीच काल एका कार्यक्रमात दिल्यानंतर त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर खोचक टीका करत यांचा इतिहासच खोटे बोलण्याचा आहे. त्यामुळे यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असला …

Read More »

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूकांबाबत निवडणूक आयोगाने केली ही घोषणा कोविड नियमांचे पालन करत होणार निवडणूका

मराठी ई-बातम्या टीम देशातील उत्तर प्रदेशसह पंजाब, मणिपूर आणि गोवा राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरु केलेली असतानाच दुसऱ्या बाजूला देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूका होणार की नाही याबाबत अनिश्चिततचे वातावरण निर्माण झालेले असतानाच निवडणूका नियोजित वेळेतच होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक …

Read More »

शरद पवारांचे ते वक्तव्य आणि राज्यपालांच्या भूमिकेवरून अजित पवार म्हणाले… मला वाटेल त्यावेळी मी बोलेन पण आम्ही राज्यपालांना समजावून सांगू

मराठी ई-बातम्या टीम विधानसभेच्या रिक्त अध्यक्षपदाच्या निवडणूकीवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आधीच राज्यातील वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा झाल्याचे सांगत फडणवीसांबरोबरील त्या औट घटकेच्या सरकार मागे आपण नसल्याचे काल स्पष्ट केले. त्यानंतर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, ठाकरे सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडी सरकार म्हणजे चेहरा लोकशाहीचा कृती हुकूमशाहीची घटनाबाह्य कार्यपद्धतीचा गाठला कळस

मराठी ई-बातम्या टीम  घटनाबाह्य कृती, लोकशाही विरोध आतंक, सत्तेची मस्ती, आणि प्रशासनाचा दुरुपयोग अश्या कितीतरी अनैतिक कृत्यांची शृंखला महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू आहे; चेहरा लोकशाहीचा आणि कृती मात्र हुकूमशाहीची असे मुख्यमंत्र्यांविना अधिवेशन चालविणारे सरकार राज्यातील जनतेला संकटाच्या दरीत लोटत आहे. भारतीय जनता पार्टी या अहंकारी सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, यासाठी राज्यभर एल्गार आंदोलन पुकारण्यात …

Read More »

सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे कोरोना पॉझिटीव्ह हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला गेल्यानंतर लागण

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे नुकतेच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना थोडीसे प्रकृत्ती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तपासणी असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच त्यांचे पती सदानंद सुळे यांचीही तपासणी …

Read More »

त्या दिवशी विधान परिषदेत काय घडले? उपसभापती कार्यालयाने दिला घटनाक्रम विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाने दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम बोलण्याची संधी नाकारल्याच्या कारणावरून विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला आहे. मात्र त्या दिवशी अर्थात काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधीच्या वेळी नेमके काय झाले याची माहिती उप सभापती कार्यालयाने जाहिर केली आहे. ती माहिती खालील प्रमाणे …

Read More »