Breaking News

राजकारण

मोदींचा आंतरराष्ट्रीय प्रभाव घटला ? अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी केंद्राचे चार मंत्री पोलंड-युक्रेन सीमेवरील घटनेनंतर मोदी सरकारचा निर्णय

मागील सात वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठा दबदबा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन-पोलंड सीमेवर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अखेर मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा प्रभाव घटला …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल ? औरंगाबादेतील समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात केले वक्तव्य

मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. तसेच त्यावेळी शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी किंवा दादाजो कोंडदेव नव्हते तर तर दस्तुरखुद्द राजमाता जीजाऊ याच होत्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, “होय, आमचीही मुले इंग्रजीत शिकली पण घरात…” स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेमुळे माझी मुले मराठीत बोलू लागली

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज आयोजित सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब असताना आमच्यावर टीका झाली की बाळासाहेब मराठी मराठी करतात आणि त्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. होय माझी दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. परंतु त्यावेळी मला बाळासाहेबांनी बोलावून सांगितले …

Read More »

राहुल गांधी स्वपक्षियांवर कडाडले, काम करायचे नसेल तर खुशाल भाजपात जा गुजरातमधील चिंतन शिबीरात सोडले टीकास्त्र

२०१४ सालापासून काँग्रेस पक्षाचा सातत्याने पराभव होत आहे. तसेच अनेक राज्ये काँग्रेसच्या ताब्यातून निसटून जात आहेत. मात्र मागील काही काळापासून राहुल गांधी यांच्याकडून मांडण्यात येत असलेल्या भूमिकेचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाची चांगलीच अडचण होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील …

Read More »

नाना पटोले म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांचीही चौकशी करा राज्य सरकारमधील वरिष्ठाच्या आशिर्वादाशिवाय फोन टॅपिंग अशक्य

फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. सरकारमधील कोणा वरिष्ठाचा आशिर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे. अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या राज्यात वेगळंच वातावरण…पटत नाही… रायगड येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत

मागील दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, आमदारांच्या आणि नुकतेच महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या घरावर छापे मारण्यात येत आहेत. तसेच या छापेममारीवरून रोज सत्ताधारी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसात राज्यातील वातावरण बदलल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या राज्यात …

Read More »

चंद्रकांत पाटील, नारायण राणे, नितेश राणेंवर तात्काळ फौजदारी कारवाई करा दिशा सालियन प्रकरणी राज्य महिला आयोगाचे पोलिसांना आदेश

दिवगंत दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सातत्याने चुकीचे आणि जाणिवपूर्वक वक्तव्य करून बदनामी करत असल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तात्काळ फौजदारी करावाई करून त्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना दिले. …

Read More »

रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले… चुकीच्या पध्दतीने फोन टॅपिंग प्रकरण

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणाऱ्या गोष्टींचा तपास करण्यासाठी फोन टॅपिंगची परवानगी घेत सत्ताधाऱ्यांचेच फोन टॅप करण्याचा प्रताप करणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुल्का यांच्यावर आज पुणे येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, विधानसभेत झालेल्या चर्चेनुसार आणि …

Read More »

मंत्री अशोक चव्हाण संभाजी राजेंना म्हणाले, तो निर्णय कायदेशीरच मागासवर्ग आयोग स्थापन करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे खासदार संभाजी राजे यांनी आजपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. त्यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, एकदा मागासवर्ग आयोगाची स्थापना केल्यानंतर दुसरा आयोग नेमता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा आयोगाची स्थापना का केली असा सवाल उपस्थित केला. …

Read More »

राज्यपालांच्या “त्या” मंजूरीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ खटला चालविण्याच्या अर्जाला दिली परवानगी

काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना शासकिय निधीचा अपहार केल्याप्रकरणी चांदूर बाझार सत्र न्यायालयाने त्यांना दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुणावली. परंतु त्यांनी वरील न्यायालयात अपील करणार असल्याचे न्यायालयाने सांगितल्याने न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. परंतु वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांनी शासकिय निधीचा अपहार केल्याची तक्रार …

Read More »