Breaking News

राजकारण

आशिष शेलार म्हणाले, असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून काय… पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुनावले

भाजपा आणि शिवसेनेतील हाडवैर सर्वश्रुतच आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभेत नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत नाशिकमधील आपल्या पक्ष नेत्यांना तशी सूचना द्यावी अशी मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती घेवून त्या अनुषंगाने कळविण्यात येईल असे स्पष्ट …

Read More »

राज्यपालांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पुन्हा माघारी पाठविला, दिले हे कारण विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक रखडली

मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली असून त्या विषयीचा प्रस्ताव मागील पावसाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यावेळीही राज्यपालांनी निवडणूकीस मंजूरी दिली नव्हती. आता याविषयीचा प्रस्ताव पुन्हा महाविकास आघाडीने पाठविल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर राज्यपालांनी सदरचा प्रस्ताव आज राज्य सरकारला …

Read More »

संसदेतच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांना सुप्रिया सुळेंनी सुनावले, आई-बाप काढायचे नाहीत काश्मीर प्रश्नावरील चर्चे दरम्यान झाली शाब्दीक खडाजंगी

पाच राज्यातील निवडणूकीनंतर पुन्हा एकदा संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून आज काश्मीर प्रश्नी संसदेत चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावत आई-बाप काढायचे नाहीत असा सज्जड दमच भरला. लोकसभेमध्ये सोमवारी जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरमधील …

Read More »

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाहीत ‘भाजप’पाल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी : नाना पटोले

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, असे असा उपरोधिक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला. विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी …

Read More »

सत्ताधारी- विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यापुढे अखेर ऊर्जा मंत्र्यांनी मान्य केली मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांना अक्षरश बोलावून आणले

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचा प्रश्न उपस्थित केला असतानाच शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्न ऐरणीवर आणला. मतदारसंघात गेले की शेतकरी विचारतात आमची वीज कापली गेली. काय करायचे? हातचे पीक पुन्हा एकदा जाईल काही तरी करा अशी आर्जवे शेतकरी करत असल्याचे …

Read More »

दरेकरांच्या प्रश्नी बोलताना फडणवीसांच्या माहितीची राष्ट्रवादीच्या आमदाराने केली दुरूस्ती प्रविण दरेकरांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हेप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा

अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान काल विधानसभेत बोलताना विधानसभेतील विरोधई पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता महाविकास आघाडीकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लक्ष करणार असल्याचे ऐकत आहोत. परंतु आम्ही कोणत्याही कारवायांना घाबरणार नाही असा इशारा दिला होता. त्यास २४ तासाचा अवधी मिळत नाही तोच प्रविण दरेकर यांच्या विरोधात आज मंगळवारी …

Read More »

नाना पटोलेंचे वक्तव्य, राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार ट्विटरद्वारे केला दावा

Nana Patole

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल अपयश आले. एवढेच नाहीतर हातात असलेल्या पंजाब सारख्या राज्याची सत्ता देखील गमावली. यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्व बदलाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच काल काँग्रेसची कार्यकारी समितीची बैठक देखील सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकीकडे या घडामोडी घडलेल्या असताना दुसरीकडे …

Read More »

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, एखादी डिटेक्टीव्ह एजन्सी काढली की काय? देवेंद्र फडणवीसांच्या सततच्या नवनव्या घोटाळा उजेडात आणण्यावर टोला

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा जसजसा नवा दिवस उजडत आहे तसा रोज एखादा नवा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसहे करत आहेत. त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला उत्तर देता देता महाविकास आघाडीलाही अडचणीचे ठरत आहे. फडणवीसांनी मागील आठवड्यात केलेल्या स्टिंग ऑपरेशन घोटाळ्याप्रकरणी आणि आज फडणवीसांनी नव्याने जाहीर केलेल्या फोन रेकॉर्डींगवरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज …

Read More »

गृहमंत्र्यांच्या उत्तरावर फडणवीस म्हणाले, ही केस सीबीआयला द्याच नाहीतर… सरकारच्या धोरणाचा निषेध करत केला सभात्याग

पहिल्या पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केल्यानंतर राज्यातील पोलिसांवर अविश्वास दाखवून केस चालेले असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला विधानसभेत सुरुवात केली, त्यावेळी ते म्हणाले की, होय मी आताही म्हणतोय राज्याच्या पोलिसांचा मला …

Read More »

फडणवीसांच्या पहिल्या पेन ड्राईव्हची चौकशी सीआयडीकडे, पण महाजन सुटले तर आनंदच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे उत्तर

राज्यातील विरोधकांना संपविण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यासोबत हात मिळवणी करून कट कारस्थान रचली जात असल्याचा आरोप पहिल्या पेन ड्राईव्हद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस केला. त्याची चौकशी सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रविण चव्हाण याने आपल्या वकील पदाचा राजीनामा दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील …

Read More »