Breaking News

गृहमंत्र्यांच्या उत्तरावर फडणवीस म्हणाले, ही केस सीबीआयला द्याच नाहीतर… सरकारच्या धोरणाचा निषेध करत केला सभात्याग

पहिल्या पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केल्यानंतर राज्यातील पोलिसांवर अविश्वास दाखवून केस चालेले असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला विधानसभेत सुरुवात केली, त्यावेळी ते म्हणाले की, होय मी आताही म्हणतोय राज्याच्या पोलिसांचा मला अभिमान आहे गर्व आहे. पण त्या पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास राज्यातील पोलिस करू शकणार नाहीत. त्यांच्यावर सतत राजकिय दबाव राहील. त्यामुळे ही केस सीबीआय द्या अशी मागणी केली.

जर राज्य सरकारने त्या स्टिंग ऑपरेशनचा तपास सीबीआयला दिला तर एका मोठ्या षढयंत्राचा भंडाफोड होईल. त्यामुळे राज्य सरकारने तो तपास पोलिसांकडे सोपवू नये असे सांगत जर राज्य सरकारने हा तपास सीबीआयकडे दिलाच नाही. तर आम्ही न्यायालयात जावू आणि तो तपास सीबीआय मार्फत करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करू असा इशारा राज्य सरकारला देत विधानसभेतून सभा त्याग केला.

त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजपाच्या आमदार आणि नेत्यांना संपविण्याची भाषा आहे. त्यामध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांची नावे असून न्यायालयाबाबतही भाष्य आहे. त्यामुळे राज्य सरकार काय स्वतःवरील आरोपाची स्वतःच चौकशी करत असल्या सारखे आहे. त्यावर आमचा विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.

हे स्टिंग ऑपरेशन बाहेर आल्यानंतर तुमच्या लोकांकडून तर यादीच बाहेर आली असून आता पुढचा नंबर प्रविण दरेकर यांचा मग गिरीष महाजनांचा ओढून ताणून केसेस करायचा प्रयत्न सुरु आहे. माझ्यावर हक्कभंग आणला तर मी उत्तर देईनच असा गर्भित इशारा देत फडणवीस पुढे म्हणाले की, सरकार उघडं पडतय त्यामुळे काही जणांना त्रास होतोय असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांची भीती, भाजपाचेच सरकार पुन्हा आल्यास सर्वसामान्यांचा मतदानाचा…

देशाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. पण त्यालाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *