Breaking News

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, एखादी डिटेक्टीव्ह एजन्सी काढली की काय? देवेंद्र फडणवीसांच्या सततच्या नवनव्या घोटाळा उजेडात आणण्यावर टोला

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा जसजसा नवा दिवस उजडत आहे तसा रोज एखादा नवा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसहे करत आहेत. त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला उत्तर देता देता महाविकास आघाडीलाही अडचणीचे ठरत आहे. फडणवीसांनी मागील आठवड्यात केलेल्या स्टिंग ऑपरेशन घोटाळ्याप्रकरणी आणि आज फडणवीसांनी नव्याने जाहीर केलेल्या फोन रेकॉर्डींगवरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज उत्तर देताना म्हणाले की, फडणवीस डिटेक्टीव्ह एजन्सी काढली की काय असा उपरोधिक टोला फडणवीसांना लगावला.

तसेच, यावेळी फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलेल्या पेनड्राईव्हचा देखील गृहमंत्र्यांनी उल्लेख केला.

आता १९९३ चा बॉम्बस्फोट हा तेव्हा झाला. २००५, २००६ आणि २००८ मध्ये मुंबई शहरावर हल्ले झाले आणि आपण आपल्या भाषणात असं म्हणताय, ३ फेब्रुवारी २०२२ रोजी या संदर्भातील एक एफआयआर दाखल झाला. १९९३ चा बॉम्बस्फोट त्यावर अनेकांना शिक्षा झाल्या होत्या आणि आता या जुन्या प्रकरणात आपण या ठिकाणी एनआयएचा एक गुन्हा दाखल करतो. हे आपल्याच भाषणातील आहे. मला या निमित्त एवढच आपल्याला विचारायंच आहे की आपण भाषण करताना हे सांगितलं की काही स्टींग ऑपरेशन झालं. १२५ तासांचं फुटेज आहे. त्यातून अनेक गोष्टी पुढे येतील मला माहीत आहे की आपण त्या दिवशी जो पेनड्राईव्ह दिला आहे अध्यक्षांना ते सगळं काही दिलेलं नाही. अजुनही काही राखून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जस जशी गरज लागेल तसं तुम्ही बाहेर काढाल न काढाल मला माहिती नाही. परंतु मला या निमित्त एकच सांगायचं आहे, की आपल्याला हे प्रकरण तुमचा आरोप काही जरी असला, तरी मी कोणाची पाठराखण करणार नाही. मात्र हे प्रकरण आपल्याला तपासावं लागेल की, या सगळ्या घटनेच्या पाठीमागे नक्की कोण आहे आणि ही घटना कशा पद्धतीने पुढे घेऊन जायची. यामध्ये कोण दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करायची असेही ते म्हणाले.

तसेच पण या निमित्त मला आपल्याला एक सांगायाचं आहे, की आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांना ३३ हजार विहिरींचा जलयुक्त शिवारांचा आपण एक पेनड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात एक ६.५ जीबीचा एक पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी आपण एक पेनड्राईव्ह दिला. आज परत आपण पेनड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? असा खोचक सवालही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांना केला.

Check Also

बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते

जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या ज‌वळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती …

Leave a Reply

Your email address will not be published.