Breaking News

राजकारण

राजच्या मदतीला देवेंद्र? काश्मीर फाईल्स आणि ३७० वरून साधला पवारांवर निशाणा १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या संख्येवरूनही साधला निशाणा

गेले काही दिवस मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आता त्यात भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीर फाईल्स चित्रपट, ३७० कलम आणि मुस्लिम धार्जिण्या वक्तव्यावरून शरद पवारांवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटावरून शरद पवारांनी जवळपास दोन …

Read More »

मनसेने जारी केले पुरंदरेंसह सात इतिहासकारांचे “ते” पत्र, हे माहित नव्हते का? पवारांनी माफी मागावी केली मागणी

गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत शरद पवार हे कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, कारण त्यांना हातची मुस्लिम मते जातील अशी भीती वाटते असा गंभीर आरोप केला. त्यास उत्तर देताना शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मांडणी फुले-शाहू-आंबेडकरांनी …

Read More »

सरसंघचालकांच्या “त्या” वक्तव्यावर संजय राऊतांचे खोचक उत्तर, आधी त्यांना.. काश्मिरी पंडीतांना सन्माने घरी तर पाठवा

उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आगामी १० ते १५ वर्षात अखंड भारत निर्माण होईल असे सांगत हे स्वप्न स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंदम यांचे असून ते आता सत्यात उतरणार असल्याचे सांगत या कार्याला सर्वांनी मिळून गती दिली तर अखंड भारत निर्माण होईल …

Read More »

सरसंघचालक म्हणाले, अखंड भारताचे स्वप्न १०-१५ वर्षात पूर्ण होणार उत्तराखंडमधील एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

मागील तीन महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तराखंड राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल अशी मोठी घोषणा करत हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असून आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो. मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल असे सांगत मोहन भागवत यांनी आगामी …

Read More »

उच्च शिक्षणमंत्री सामंताची मोठी घोषणा, परिक्षेचा वेळ वाढविला ऑफलाईन परिक्षेचा कालावधी प्रती तास १५ मिनिटांनी वाढविला

मागील दोन वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचे संकट होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काँलेज आणि महाविद्यालयात न जाता ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे अनेक परिक्षा याही ऑनलाईन पध्दतीने घ्याव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लिखानाचा सराव कमी झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परिक्षेसाठी वाढीव वेळ देण्याची मागणी करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण …

Read More »

मार्च २०२४ पर्यंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या कामास मुदतवाढ २०९ कोटी कंत्राटदारास अदा इमारतींचे ४९ टक्के तर पादपीठाचे ६ टक्के काम पूर्ण

मुंबईतील इंदू मिल येथील सुरु असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या कामास मुदतवाढ दिली असून मार्च २०२४ पर्यत काम पूर्ण होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत २०९ कोटी रुपये कंत्राटदारास दिले असून इमारतींचे ४९ टक्के तर पादपीठाचे ६ टक्के काम पूर्ण झाले आहे. …

Read More »

धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर: मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली चौकशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला …

Read More »

विश्वगुरुच्या कृपेने भारतात जगातील सर्वात जास्त महाग एलपीजी-सीएनजी सीएनजी ५ रुपये तर व पीएनजी ४.५० रुपये वाढवून लूट सुरुः नाना पटोले

विश्वगुरुची उपाधी घेऊन मिरवणारे नरेंद्र मोदी यांच्या कृपेने भारत जगात एका बाबतीत पहिल्या नंबरवर केला आहे. महासत्तेचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी एलपीजी गॅसची किंमत जगात सर्वात जास्त भारतात करून एका वेगळाच विक्रम स्थापित केला आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महागाईच्या प्रश्नावर मोदी सरकारचा समाचार घेताना नाना …

Read More »

राज्याच्या राजकारणातील जॉनी लिवर कोण ? राज ठाकरे आणि आव्हाड मध्ये जुंपली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे येथील सभेनंतर राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते यांच्यातील खडाजंगी चांगलीच गाजते आहे. राज ठाकरे यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवर खरमरीत टीका केली आहे. त्याला राष्ट्रवादीकडूनही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. पक्षाचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भाजपाचे हिंदूत्व हा भाजपाचा श्वास असल्याची कबुली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पार्टी खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले. राज ठाकरे …

Read More »