Breaking News

सरसंघचालकांच्या “त्या” वक्तव्यावर संजय राऊतांचे खोचक उत्तर, आधी त्यांना.. काश्मिरी पंडीतांना सन्माने घरी तर पाठवा

उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आगामी १० ते १५ वर्षात अखंड भारत निर्माण होईल असे सांगत हे स्वप्न स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंदम यांचे असून ते आता सत्यात उतरणार असल्याचे सांगत या कार्याला सर्वांनी मिळून गती दिली तर अखंड भारत निर्माण होईल असे

वक्तव्य केले. या वक्तव्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सरसंघचालक भागवत यांना खोचक उत्तर देत म्हणाले की, अखंड हिंदुस्थान जरूर करावा पण आधी काश्मिरी पंडीतांची घऱवापसी सन्मानाने आणि आदराने होऊ द्या.

अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करु. १५ वर्ष नाही १५ दिवसात करा असे सांगत तसंच सर्वात आधी अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पाहणाऱ्या वीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी खोचक सूचनाही त्यांनी यावेळी केली. यासोबतच बाळासाहेब आणि वीर सावरकरांचे आभार माना असा सल्लाही त्यांनी दिला.

अखंड हिंदुस्थानाचं कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. २०१४, २०१९ मध्ये भाजपाने याच मुद्द्यावर मतं मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. पण त्याआधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या. कारण अखंड हिंदुस्थान त्यांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. तुम्ही सावरकर आणि बाळासाहेब यांचे आभार माना कारण त्यांनी ही संकल्पना रुजवली असे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.

अखंड हिंदुस्थान जरुर करा पण आधी काश्मिरी पंडितांची घऱवापसी सन्मानाने आणि आदराने होऊ द्या. मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली आहे त्याचं कौतुक झालं पाहिजे असेही ते म्हणाले.

मी रामनवमीला घडलेल्या घटना पाहिल्या. रामनवमी या देशात आधीही साजरी झाली आहे. भविष्यात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत तिथेच ज्या पद्धतीने रामनवमीला हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत हे रामनवमीला याआधी झालेलं आठवत नाही. हे या देशाचं दुर्देव आहे. हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेने ढकलताना दिसत असल्याबाबत सूचक आरोप करत चिंता व्यक्त केली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *