Breaking News

मार्च २०२४ पर्यंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या कामास मुदतवाढ २०९ कोटी कंत्राटदारास अदा इमारतींचे ४९ टक्के तर पादपीठाचे ६ टक्के काम पूर्ण

मुंबईतील इंदू मिल येथील सुरु असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या कामास मुदतवाढ दिली असून मार्च २०२४ पर्यत काम पूर्ण होणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत २०९ कोटी रुपये कंत्राटदारास दिले असून इमारतींचे ४९ टक्के तर पादपीठाचे ६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाबाबत विविध माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले आहे स्मारकाचे मुळ संकल्पनेनुसार अपेक्षित खर्च ७६३.०५ कोटी आहे व त्यास सुधारित संकल्पनेनुसार १०८९.९५ कोटी रुपये इतकी मान्यता देण्यात आली आहे. आजतागायत प्रकल्पातील एकूण २०९.५३ किती २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अदा करण्यात आले आहे यात मोबीलायझेशन ऍडव्हान्स रु ३१.६५ कोटी व प्रकल्प सल्लागाराचे शुल्क रु १२.६८ कोटींचा अंतर्भाव आहे. यात कंत्राटदार मेसर्स शापूरजी पालोनजी तर प्रकल्प सल्लागार मेसर्स शशी प्रभू असोशिएट्स आणि डिझाईन असोशिएट्स आयएनसी आहेत.
सद्यस्थितीत प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतींचे ४९ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे तर स्मारकातील पादपीठाचे ६ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास वाढीव कालावधी मार्च २०२४ पर्यंत देण्यात आला आहे. ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून ३६ महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
अनिल गलगली यांच्या मते प्रकल्प १४ महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना कंत्राटदारांकडून उशीर करण्यात आला आहे. हा प्रकल्प आता वाढीव मुदतवाढीत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए तर्फे योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. याबाबत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच एमएमआरडीए आयुक्त यांना पत्र पाठविले आहे.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *