Breaking News

उच्च शिक्षणमंत्री सामंताची मोठी घोषणा, परिक्षेचा वेळ वाढविला ऑफलाईन परिक्षेचा कालावधी प्रती तास १५ मिनिटांनी वाढविला

मागील दोन वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचे संकट होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काँलेज आणि महाविद्यालयात न जाता ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे अनेक परिक्षा याही ऑनलाईन पध्दतीने घ्याव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लिखानाचा सराव कमी झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परिक्षेसाठी वाढीव वेळ देण्याची मागणी करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परिक्षेच्या वेळेत प्रती तास १५ मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उदय सामंत यांना या संदर्भात युवा सेनेने पाठवलेल्या मागणी पत्रात म्हटले होते की, मागील दोन वर्षांत करोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने व विद्यापीठांनी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे.

तसेच, या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की, दोन वर्षे (एमसीक्यू) बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे पेपर लिहिण्यासाठी आवश्यक असलेला लिखाणाचा सराव राहिलेला नाही. म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आपणास विनंती करतो की, व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी जो वेळ ठरवून दिलेला आहे. त्यापेक्षा अर्धा, एक तास वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी युवा सेनेकडून करण्यात आली.
यामुळे जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत पूर्ण पेपर लिहिता येईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही ही बाबही युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई आणि कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *