Breaking News

राहुल गांधी स्वपक्षियांवर कडाडले, काम करायचे नसेल तर खुशाल भाजपात जा गुजरातमधील चिंतन शिबीरात सोडले टीकास्त्र

२०१४ सालापासून काँग्रेस पक्षाचा सातत्याने पराभव होत आहे. तसेच अनेक राज्ये काँग्रेसच्या ताब्यातून निसटून जात आहेत. मात्र मागील काही काळापासून राहुल गांधी यांच्याकडून मांडण्यात येत असलेल्या भूमिकेचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाची चांगलीच अडचण होत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांची शाळा घेत म्हणाले, काँग्रेसचे अनेक नेते एसीमध्ये बसून भाषणे करत आहेत. त्यामुळे एसीच्या बाहेर पडून पक्षाचे काम करायचे नसेल तर त्यांनी खुशाल भाजपात जावे असा निर्वाणीचा इशारा दिला.

गुजरातमध्ये गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षाखेरीस गुजरातमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाने कंबर कसली आहे. त्यासाठीच आजच्या चिंतन शिबिराची आखणी करण्यात आली होती. या शिबिरात राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी स्वपक्षीय नेतेमंडळींची चांगलीच कानउघाडणी केली.

काँग्रेसमध्ये नेते-कार्यकर्त्यांचे दोन वर्ग दिसत आहेत. एक म्हणजे जे बोलतात आणि एक म्हणजे जे प्रत्यक्ष काम करतात. एकीकडे पक्षात अशी लोक आहेत जी २४ तास लोकांमध्ये राहून काम करत असतात. टीका-टिप्पणी सहन करतात. दुसरीकडे अशी लोकं आहेत, जी फक्त एसीमध्ये बसून मोठमोठी भाषण ठोकतात, मजा मारतात अशी कान उघडणी करत ते पुढे म्हणाले, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून पक्ष दूर गेला असल्याचं देखील राहुल गांधी यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पक्षात काम न करणाऱ्यांना भाजपामध्ये जाण्याचा सल्ला देत आपण जनतेला काँग्रेसमधल्या अशा लोकांची यादी दिली पाहिजे, जे काम करतील आणि राज्याला योग्य मार्ग दाखवतील. पण दुसरीकडे या कामात अडथळा आणणारे देखील लोक आहेत. ते भाजपामध्ये जाऊ शकतात असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी स्वपक्षातील नेत्यांना दिला.

सध्या देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून १० मार्च रोजी या पाचही राज्यांमधील निवडणुकांचा निकाल लागणार आहे. तर गुजरातमध्ये या वर्षाखेरीस निवडणुका होणार आहेत. २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांची सारी सुत्रे राहुल गांधी यांनी स्वत:च्या हाती घेतल्याने त्यावेळी काँग्रेसला १८२ पैकी ७७ जागांवर विजय मिळाला. मात्र आता आगामी गुजरात विधानसभा निवडणूकीत काँग्रेस गतवेळी मिळविलेल्या जागा राखणार की त्यापेक्षा जास्त मिळवित गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार याचे उत्तर विधानसभा निवडणूकीतच मिळेल.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *