Breaking News

चंद्रकांत पाटील, नारायण राणे, नितेश राणेंवर तात्काळ फौजदारी कारवाई करा दिशा सालियन प्रकरणी राज्य महिला आयोगाचे पोलिसांना आदेश

दिवगंत दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सातत्याने चुकीचे आणि जाणिवपूर्वक वक्तव्य करून बदनामी करत असल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तात्काळ फौजदारी करावाई करून त्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मालवणी पोलिसांना दिले.

काही दिवसांपूर्वी दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हणाले की, दिशाने आत्महत्या नाही केली तर तिची हत्या करण्यात आली आहे. तसेच त्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृत्यूवेळी ती गरोदर असल्याचे सांगत तिच्या हत्येच्या कृत्यात महाविकास आघाडीतील मंत्री सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप करत दावा केला.

त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही दिशा सालियनची हत्या झाल्याचे सांगत याबाबतचे सत्य ७ मार्च नंतर बाहेर येईल असे जाहीर वक्तव्य केले. तर नितेश राणे यांनी दिशा सालियनबाबत ट्विट करत संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात वक्तव्य केल्याने दिशा सालियन हिची बदनामी होत असल्याची तक्रार तिच्या कुटुंबाने केली. तसेच मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार राज्य महिला आयोगाने मालवणी पोलिसांना यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत दिशा सालियन हीच्या शवविच्छेदन अहवालात तिची हत्या, बलात्कार झाल्याचे किंवा गरोदर असल्याचे दिसून आले नसल्याचा अहवाल पोलिसांनी राज्य महिला आयोगाला सादर केला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तात्काळ फौजदारी कारवाई करून कारवाई करावी आणि त्याचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आज पोलिसांनी नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *