Breaking News

राजकारण

बळीराजाच्या रेट्यापुढे अहंकारी, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला झुकावे लागले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची भिती, देशातील बळीराजाच्या आंदोलनाचा रेटा व जनमताचा प्रचंड विरोधापुढे केंद्रातील भाजपा सरकारला झुकावे लागले असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करावी लागली. हा देशातील शेतक-यांचा ऐतिहासिक विजय असून अहंकारी हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारचा पराभव झाल्याचे …

Read More »

पंतप्रधान म्हणाले, देशाची माफी मागतोय, ते कायदे मागे घेण्याचा निर्णय तब्बल वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह सबंध देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते. त्या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शीख धर्मगुरू गुरूनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधत मी देशाची माफी मागतोय, आम्ही चांगल्या उद्देशाने कृषी कायद्यांची निर्मिती केली. पण …

Read More »

शरद पवारांचा भाजपाला इशारा, हिशोब तुम्हाला द्यावा लागेल अमरावतीतील दंगल आणि अनिल देशमुख अटकेनंतर पवारांची प्रतिक्रिया

नागपूर-वर्धा-मुंबई: प्रतिनिधी विदर्भाला ती मंत्रीपद देण्याचा आमचा मानस होता. परंतु जागा कमी असल्याने ते शक्य झाले नाही. परंतु नागपूरच्या अनिल देशमुखांना ज्या पध्दतीने षडयंत्र करून आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर गैरवापर करून तुम्ही तुरुंगात टाकले. त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे नाव न …

Read More »

अनिल परबांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा…. तर प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांना कामावर घेवू

मुंबई: प्रतिनिधी जवळपास १५ दिवसाहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांकडून तोडगा अद्याप निघालेला नाही. तसेच चर्चेच्या अनेक फेऱ्या होत आहेत. परंतु निर्णय काही होत नाही. त्यातच मागील आठभरात जवळपास ३ हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी …

Read More »

वानखेडे, माजी आमदार डॉ.बोंडे आणि… मलिकांकडून एकदम तीन गौप्यस्फोट वानखेडेंचा शाळेचा दाखला, पहिल्या पत्नीच्या भावाला खोट्या केसमध्ये अडकविणे, धमकाविणे

मुंबई: प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर पुढील सुणावनी आज होत आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जातीबाबत स्पष्टता आणणारी कागदपत्रामधील महत्वाचा भाग असलेली शाळेच्या जन्म दाखल्याच्या प्रती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब यांनी …

Read More »

२ वर्षानंतर भाजपाने विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केली ही चांगली गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपाला उपरोधिक टोला

मुंबईः प्रतिनिधी भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजपा आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले. भाजपाने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. …

Read More »

१० वी परिक्षेसासाठी अर्ज भरण्याची तारीख जाहीर “या” तारखेपासून स्विकारणार शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, …

Read More »

भाजपा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने झाल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी भाजपा तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत. प्रशासनाने भाजपा कार्यकर्त्याना खोटया नाट्या गुन्ह्याखाली अडकवणे थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव …

Read More »

केंद्राने राज्याचे ३० हजार कोटी रुपये हडपले: आता महाराष्ट्रानेही दर कमी करावे कंगणाच्या बाष्कळ बडबडीला व्यासपीठ देऊन माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्याच्या अवमानाच्या मोहिमेत सहभागी होऊ नये

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार मागील सात वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढवून जनतेची लूट करत आहे. सतत दरवाढ करुन तिजोरी भरत असताना लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोलवर ५ रुपये व डिझेलवर १० रुपये …

Read More »

मलाना क्रिम घेवून बोलल्याने बापूंचे विचार संपतील असा समज असेल तर चूक महात्मा गांधी ही व्यक्ती नाही विचार आहेत आणि हा विचार जगाने स्वीकारलाय-नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही असे राष्ट्रवादी …

Read More »