Breaking News

राजकारण

काँग्रेस प्रवक्ते म्हणाले, आपल्या विद्यार्थ्याची प्रगती पाहून रशियन अध्यक्ष पुतिन खुश असतील कोणत्या राजकिय पक्षाला किती निधी मिळाला? काँग्रेसने केली माहिती उघड

मराठी ई-बातम्या टीम देशातील राजकिय पक्षांना मिळणाऱ्या निधींची माहिती आता निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदाच्यावर्षी भाजपा, आम आदमी पार्टी, काँग्रेस, भाजपाचे मित्रपक्षासह इतरांना किती निधी मिळाला याची सांद्यत माहितीच काँग्रेसने जारी केली असून या रशियात पुतीन यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणाची हुबेहुब प्रतिकृती देशातही राबविण्यात येत …

Read More »

आरक्षणाच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे लोक एका विशिष्ट विचारधारेचे ज्यांचं आरक्षण विरोधी धोरण राहिले तेच या देशात आता नवीन वाद निर्माण करत आहेत- नवाब मलिक यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम ज्यांचं आरक्षण विरोधी धोरण राहिले आहे तेच या देशात आता नवीन वाद निर्माण करत आहेत. मात्र कुठलंही आरक्षण मग ते एससी, एसटी आणि ओबीसी या आरक्षणाला बाधा येणार नाही ही राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले. …

Read More »

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या ठिकाणाला तीर्थ क्षेत्राचा दर्जा नगरविकास विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला येथील मुक्तिभूमीला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी नगरविकास विभागाला पाठवला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. येवल्यातील …

Read More »

ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद/नगर पंचायतीत सफाई कर्मचाऱ्यांना घेणार १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना होणार लाभ- शासन निर्णय जारी

मराठी ई-बातम्या टीम ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला. त्याबाबतचा शासन निर्णय आजणसोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. नवनिर्मिती नगर …

Read More »

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली. भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णयः डेटा आणि आयोगाशिवाय आरक्षण नाही राज्य मंत्रिमंडळाच्या अध्यादेशाला स्थगिती

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत २७ टक्के आरक्षण देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला आणि त्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार इम्पिरियल डेटा आणि आयोगाच्या शिफारसींशिवाय ओबीसी समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचा निकाल देत …

Read More »

उमेदवारी अर्ज भरलाय? मग आता ही कागदपत्रे सादर करा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मराठी ई-बातम्या टीम जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. राज्य …

Read More »

ज्यांनी अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्य नगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी ? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनावर टीका

मराठी ई-बातम्या टीम केवळ स्वातंत्ऱ्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगानी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत नाशिक येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनावर टीका केली. …

Read More »

एमपीएससी परिक्षार्थींसाठी खुषखबर: परिक्षा आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर ३० एप्रिल २०२३ पर्यतचे वेळापत्रक जाहीर केले

मराठी ई-बातम्या टीम पुणे येथे एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्निल लोणकर यांने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीच्या सुस्त कारभारावर टीकेचा भडीमार झाला. त्या टीकेतून बोध घेत अखेर एमपीएससी आणि राज्य सरकारने एमपीएसकडून घेण्यात येणाऱ्या रिक्त जागांसंदर्भातील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून या परिक्षा जानेवारी २०२२ पासून ते एप्रिल २०२३ पर्यतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. …

Read More »

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी वर्षात जवळपास विविध सणांच्या २५ दिवसांच्या सुट्या मिळत आहेत. तर त्यातील ८ सणवार हे शनिवार, रविवारी येत असल्याने अतिरिक्त मिळणारे ८ दिवस सुट्यांचे या सर्वांना मिळणार नाहीत. आगामी वर्षात सर्वात कमी सुट्या आल्याने आपसूच कर्मचाऱ्यांना …

Read More »