Breaking News

राजकारण

सोमय्यांच्या पिटाऱ्यांतून मंत्री मुश्रीफ आणि कुटुंबियांची फाईल बाहेर १२७ कोटींचा घोटाळ्याचा आरोप: ईडी, सीबीडीटी, आयकर विभागाकडे तक्रार करणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील दोन मंत्र्यांचे घोटाळ‌े उघडकीस आणणार असल्याची घोषणा केल्याप्रमाणे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या पत्नी शाएदा आणि सुपुत्र नाविद यांनी १२७ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा करत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात गुंतविल्याचा आरोप करत यासंदर्भात ईडी, आयकर विभाग, वित्त मंत्रालय यांच्याकडे २७०० पानांचे …

Read More »

न्यायालयाचे निकाल राज्याच्या विरोधात का जात आहेत ? नाना पटोलेंचा भाजपाबरोबरच आता थेट राज्याच्या महाधिवक्त्यांवर निशाणा

नागपूर : प्रतिनिधी राज्यातल्या ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरियल डेटा घेवून पुन्हा न्यायालयात येण्यास सांगितले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आम्हाला त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा अशी मागणी करत आरक्षण न मिळण्यास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत राज्याचे महाधिवक्ता पूर्वी आणि आताही आशुतोष कुंभकोणी हेच असताना …

Read More »

… त्यामुळेच महिलांची सुरक्षा वाऱ्यावर प्रविण दरेकरांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

मुंबई: प्रतिनिधी सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली असून पोलिसांनाही काम करणं कठीण झालं आहे, पोलिसांचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, वाझेंसारख्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, असा घणाघात विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर केला. …

Read More »

आता तरी कामाला लागा…दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देवू नका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींच्या मुळावर उठललेलं हे प्रस्थापितांचं महाआघाडी सरकार, हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही. आता तरी कामाला लागा, स्वताच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका असा दम भाजपा आमदार गोपीचंद पडकळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला देत लवकारत लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर ओबीसी भटका विमुक्त …

Read More »

पोलिस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्याचे आदेश, “महिन्यात आरोपपत्र…” मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे

मुंबई: प्रतिनिधी साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घुण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून …

Read More »

आता मुख्यमंत्री ठाकरेंनीच तपासावर देखरेख ठेवावी… राज्यात कायद्याचा धाक नाही, आघाडी सरकारने विचार करावा- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ अशा घटना घडल्या असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेऊन गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करावा असे आवाहन करत मुंबईतील साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत राज्यात …

Read More »

भाजपा इलेक्शन मोडमध्ये, गुजरातचे मुख्यमंत्री रूपाणींचा राजीनामा गृहमंत्री अमित शाह यांचा गुजरात दौऱ्यानंतर बदल

साधारणत: एक वर्षानंतर उत्तर प्रदेश, गुजरातसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सलग २० वर्षाहून अधिक काळ गुजरातमधील आपली सत्ता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा घेत नवा चेहरा देण्याचे संकेत दिले आहेत. रात्री गुजरात दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अमित …

Read More »

पालकमंत्री दत्ता भरणे म्हणाले, सोलापूरची तुलना पुण्याशी नकोच एकाच दिवसात शनिवारी होणार २ लाख जणांचे लसीकरण

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्हा मोठा आहे. सिरम इन्स्टिट्यूटसह विविध सामाजिक संस्था व संघटना पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसींची उपलब्धता करून देत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण होत आहे. आज राज्यामध्ये सर्वाधिक लसींचे डोस सोलापूर जिल्ह्याला मिळत आहेत. लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आला आहे. ही …

Read More »

पवारांना पटोलेंचे प्रत्युत्तर, “राखायला दिलेल्यांनीच जमीन चोरली” शरद पवारांच्या टीकेनंतर काँग्रेसकडून उपरोधिक टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज गणेश चतुर्थीचा दिवस असल्याने राजकिय क्षेत्रात सगळी शांतता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसची अवस्था एखाद्या जमिनदाराच्या हवेली सारखी झाल्याची टीका करत खळबळ उडवून दिली. त्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यास प्रत्युत्तर देत जमीन राखायला दिलेल्यांनीच जमिनीची चोरी केल्याचा पलटवार करत पवारांवर …

Read More »

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीसंदर्भात अजित पवार म्हणाले… म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. त्यांच्या काही समस्या मांडत असतात. ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीबाबत व्यक्त केली. पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना …

Read More »