Breaking News

सोमय्यांच्या पिटाऱ्यांतून मंत्री मुश्रीफ आणि कुटुंबियांची फाईल बाहेर १२७ कोटींचा घोटाळ्याचा आरोप: ईडी, सीबीडीटी, आयकर विभागाकडे तक्रार करणार

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील दोन मंत्र्यांचे घोटाळ‌े उघडकीस आणणार असल्याची घोषणा केल्याप्रमाणे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या पत्नी शाएदा आणि सुपुत्र नाविद यांनी १२७ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा करत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात गुंतविल्याचा आरोप करत यासंदर्भात ईडी, आयकर विभाग, वित्त मंत्रालय यांच्याकडे २७०० पानांचे पुरावे सादर करत तक्रार करणार असल्याची घोषणा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी आरोप केला.

शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ आता सोमय्या यांनी किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा वळविला आहे. मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती खरेदी केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला.

मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद CRM Systems PVT LTD या कंपनीकडून २ कोटी ४५ लाख रूपयांचे कर्ज घेतल्याचे दाखविले आहे. ही कंपनी शेल कंपनी असून हि कंपनी प्रविण अगरवाल ऑपरेट करत असून या कंपनीवर २०१७-१८मध्ये प्रतिबंध आला होता. त्या कंपनीतून ज्यांनी एंट्री घेतली, त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सीआरएम कंपनीकडून रक्कम घेतल्याची नोंदही आहे. तसेच ही कंपनी ही शेल कंपनी असल्याचे सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी केला.

त्यानंतर मरू भूमी कंपनीत ३ कोटी ५ लाख रक्कम दाखवली आहे. बाप-बेटे दोघांविरोधात १२७ कोटींचे तर पुरावे असल्याचे सांगत हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या अकाऊंटमध्ये सर संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० रुपयांचे शेअर्स दाखवले. शाएदा हसन मुश्रीफ यांच्या नावाने २०१८-१९ मध्ये मुश्रीफ परिवारावर आयकर विभागाचे सर्च झाले. त्यातून आलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात १४७ कोटी रुपयांचे पुराव्यानिशी बेनामी व्यवहार सिद्ध झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मंगळवारी उद्या मुंबई ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे. २७०० पानांचे पुरावे त्यांना देणार असून परवा दिल्लीत अर्थविभाग, ईडी, कंपनी मंत्रालय यांच्याकडेही हे पुरावे मी सादर करणार आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी घोटाळा ११ मध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार आहे. माझ्याकडे २ मंत्र्यांच्या फाईल तयार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आज एनसीपीच्या एका मंत्र्याचा घोटाळा उघड केला आहे. काही दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचा देखील घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

हसन मुश्रीफ यांनी घोटाळा करताना काही मेथेड वापरली यामध्ये एखाद्या ऑपरेटरला पकडायचे त्याच्याकडे शेल कंपनी असती त्या कंपनीत दुसऱ्या एका कंपनीकडून ते पैसे त्या कंपनीच्या खात्यात जमा होतात आणि मग ते पैसे त्या कंपनीतून संबधित व्यक्तीला दिले जातात. त्यासाठी रोख रक्कम संबधित ऑपरेटरला दिले जात असल्याचे तपशीलही त्यांनी यावेळी देत छगन भुजबळ प्रकरणात जैन नामक ऑपरेटर होता याची आठवणही त्यांनी करून दिली.

Check Also

दादरमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांची माहिती

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये आता शिवसेनेत बंडाचे निशाण फडकाविलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना भवनच्या धर्तीवर …

Leave a Reply

Your email address will not be published.