Breaking News

आता तरी कामाला लागा…दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देवू नका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

ओबीसींच्या मुळावर उठललेलं हे प्रस्थापितांचं महाआघाडी सरकार, हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही. आता तरी कामाला लागा, स्वताच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका असा दम भाजपा आमदार गोपीचंद पडकळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला देत लवकारत लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा असा इशाराही त्यांनी दिला.

ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यात कुठलही राजकारण न करता आम्हीही त्यास पाठींबा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द ठरवला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच याविषयीचे वारंवार संकेत दिले होते. आपलं म्हणनं मांडलं, पण हया प्रस्थापितांनी केंद्राकडे बोट दाखवत सेन्ससचा डेटा की इंपेरिकल डेटा असा वाद घातल्याचा आरोप त्यांनी केली.

जर वेळ वाया न घालवता इंपेरिकल डेटा गोळा केला असता तर आणि त्वरित न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असती…तर ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळालं असतं असे सांगत ते म्हणाले की, आता उशिरा त्यांना देवेंद्र फडणवीसांचं म्हणनं कळून चुकलंय आणि मान्यही केले की इंपेरिकल डेटा शिवाय आपल्याला हे ओबीसींचं राजकीय आरक्षण खेचून आणता येणार नाही.

परंतु आताही राज्यमागासवर्ग आयोगाला बसायला साधं ॲाफीस नसल्याचे सांगत डेटा गोळा करण्यासाठी व त्याची शास्त्रशुद्ध मांडणी करण्यासाठी नेमकं आपण कोणत्या एजन्सीला अपॅाईंट केलाय का ? असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला.

तीन महिन्यात आरक्षण द्या, अन्यथा परिणाम भोगा- चंद्रशेखर बावनकुळे 

संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला निवडणूका घ्याव्या लागतात, पण राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका पुढे ढकलू असं म्हणत, राज्यातील ओबीसी जनतेची दिशाभूल केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांझोट्या बैठका घेतल्या, आणि वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झटका दिला, निवडणूका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही, हा प्रश्न आहे. पण आताही तीन महिन्यात इम्पेरीकल डाटा गोळा करुन, ओबीसींना आरक्षण द्यावं, नाही तर राज्यातील ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि भाजप या सरकार विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आडनाव गृहित धरणे चुकीचे आयोगापर्यंत अचुक माहिती पोहचवण्यासाठी संबंधितांना सुचना द्या

नुकतेच ओबीसीच्या इम्पिरियल डेटा गोळा करण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे कान टोचल्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published.