Breaking News

एमपीएससी परिक्षार्थींसाठी खुषखबर: परिक्षा आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर ३० एप्रिल २०२३ पर्यतचे वेळापत्रक जाहीर केले

मराठी ई-बातम्या टीम

पुणे येथे एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्निल लोणकर यांने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीच्या सुस्त कारभारावर टीकेचा भडीमार झाला. त्या टीकेतून बोध घेत अखेर एमपीएससी आणि राज्य सरकारने एमपीएसकडून घेण्यात येणाऱ्या रिक्त जागांसंदर्भातील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून या परिक्षा जानेवारी २०२२ पासून ते एप्रिल २०२३ पर्यतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता परिक्षार्थींना अभ्यासाची तयारी करणे शक्य होणार आहे.

या वेळापत्रकानुसार ऑक्टोंबर महिन्यात प्रसिध्द केलेल्या जाहिरातीतील पदांसाठीची परिक्षा २ जानेवारी २०२२ रोजी पहिली राज्य सेवा परिक्षा घेण्यात होणार आहे. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ वर्गातील रिक्त जागांसाठी दिलेल्या जाहीरातील पदांसाठीची परिक्षा ही १२ मार्च रोजी होणार आहे. अराजपत्रित आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा परिक्षा खाली रिक्त पदांसाठी ऑक्टोंबर महिन्यात दिलेल्या जाहिरातीतील पदांसाठीची परिक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

तसेच डिसंबर २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या ४ जाहिरांतीतील रिक्त पदांसाठीची परिक्षा मार्च आणि एप्रिल महिन्यात होणार आहे. तर एप्रिल, मार्च आणि जून २०२२ मध्ये प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीतील रिक्त पदांसाठीची परिक्षा जून, ऑगस्ट, ऑक्टोंबर २०२२ मध्ये होणार आहे. त्याचबरोबर जून आणि जुलै महिन्यातही आणखी काही जाहिराती प्रसिध्द करण्यात येणार असून त्यातील रिक्त पदांसाठीच्या परिक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबर २३ मध्ये होणार आहे.

या परिक्षा वेळांमुळे आता राज्यात विविध शासकिय पदांसाठी परिक्षा देवून सरकारी सेवेत येवू इच्छिणाऱ्या परिक्षार्थींना आपल्या अभ्यासाचे नियोजन करून त्यानुसार परिक्षेची तयारी करता येणार आहे. त्याचबरोबर निकालांच्या तारखाही एमपीएससीकडून जाहीर करण्यात आल्याने आता परिक्षेचा निकाल कधी लागणार याचा ताण या परिक्षार्थींच्या मनावर राहणार नाही. तसेच एका परिक्षेत अयशस्वी ठरल्यास लगेच त्यानंतरच्या परिक्षेसाठी तयारी करणे सोपे होणार आहे. त्यामुळे एमपीएससीने एकप्रकारे परिक्षार्थींच्या वाढत्या वयाचा आणि त्यांच्या मानसिकतेचा विचार करून हे वेळापत्रक जाहीर केल्याचे दिसून येत आहे.

एमपीएससीकडून जाहीर करण्यात आलेले जाहिरात, परिक्षा आणि निकालाचे हेच ते वेळापत्रक : 

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *