Breaking News

अनिल परबांचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा…. तर प्रतिक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांना कामावर घेवू

मुंबई: प्रतिनिधी

जवळपास १५ दिवसाहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांकडून तोडगा अद्याप निघालेला नाही. तसेच चर्चेच्या अनेक फेऱ्या होत आहेत. परंतु निर्णय काही होत नाही. त्यातच मागील आठभरात जवळपास ३ हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचारी परत आले तर ठिक अन्यथा… प्रतिक्षा यादीवरील कामगारांना कामावर घेवू असा निर्वाणीचा इशारा दिला.

अनिल परब यांनी या निर्वाणीच्या दिलेल्या इशाऱ्यावरून संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये आणखी रोष निर्माण होण्याची शक्यता असून या इशाऱ्यानंतर एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाची कोंडी अद्याप फुटलेली नाही. राज्य सरकारकडून वारंवार आवाहन करून देखील आंदोलक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. अगोदरच्या भरतीमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचे, अनिल परब यांनी सांगितलं आहे. आंदोलक कर्मचारी कामावर परत आले नाही तर नव्या कामगारांना कामावर घेण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.

२०१६-१७ आणि २०१९ मधील भरतीतील प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची यासाठी चाचपणी सुरू आहे. शेवटी एसटी ही गरिबाची जीवनवाहिनी आहे आणि ती जर ठप्प झाली. तर, सरकारचं दायीत्व आहे की, लोकांचं देखील सरकार आहे, जसं कर्मचाऱ्यांच्याबाबतीत सरकारचं धोरण आहे, तसं लोकांच्या बाबतीत देखील लोकांना पर्यायी व्यवस्था करून देणं हे देखील सरकारचं काम आहे. त्यामुळे जर हे कामगार आपल्या मागणीवरती अडून बसले, तर सरकारला वेगवेगळ्या पर्यायांचा उपाय योजलाच पाहिजे आणि त्या पद्धतीचे प्रक्रिया सुरू झाल्याचे ते म्हणाले.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी आता नवीन समिती नेमण्याची मागणी हायकोर्टात केली आहे. सरकारने नेमलेल्या समितीवर विश्वास नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करा अशी मागणी कर्मचारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात केली.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी काही सूचना केल्याचेही परब यांनी सांगितले.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *