Breaking News

EPF खात्यातूनही भरता येईल LIC प्रीमियम, जाणून घ्या कसे फक्त या गोष्टी करा

मुंबई: प्रतिनिधी

कोणत्याही कारणास्तव तुम्हाला LIC च्या जीवन विमा पॉलिसीचा प्रीमियम भरण्यात आर्थिक समस्या येत असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही तुमचे EPF खाते वापरून या समस्यांवर मात करू शकता. तुमच्या EPF खात्यातील रक्कम तुमच्या LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्याच्या समस्येवर उपाय ठरू शकते. म्हणजे  EPF मधील पैशातून पॉलिसीचा प्रीमियम भरला जाऊ शकतो.

EPFO कशी मदत करू शकते?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 अंतर्गत, EPF खातेधारक त्यांच्या जीवन विमा पॉलिसीचे पैसे ईपीएफ अॅडव्हान्स (EPF advance) द्वारे भरू शकतात. ईपीएफ अॅडव्हान्सची ही सुविधा कोरोनाच्या या युगात खूप उपयोगी ठरली आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे विम्याचा हप्ता भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्याची पॉलिसी लॅप्स होऊ शकली असती, परंतु ईपीएफ अॅडव्हान्समुळे आगाऊ विम्याचा हप्ता भरण्यास मदत झाली.

ईपीएफ अॅडव्हान्स कसा काढायचा?

तुम्ही पगारदार व्यक्ती असल्यास तुमच्या EPF खात्यातून LIC च्या जीवन विमा पॉलिसीचे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था) कळवावे लागेल. LIC पॉलिसी खरेदी करताना तुम्ही अशी माहिती EPFO ला देखील देऊ शकता किंवा काही हप्ता भरल्यानंतर तुम्ही फॉर्म 14 सबमिट करू शकता. हा फॉर्म ईपीएफओच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर हप्त्याच्या तारखेपूर्वी तुमच्या EPF खात्यातून LIC प्रीमियम आपोआप कापला जाईल.

ईपीएफ अॅडव्हान्स मिळण्याची पात्रता

– जर तुम्हाला EPF द्वारे विमा पॉलिसी प्रिमियम भरायचा असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुमच्या EPF खात्यात पुरेसे पैसे आहेत.

–  तुम्हाला विमा पॉलिसीचा पहिला हप्ता भरायचा असेल, तर तुमच्या खात्यात २ वर्षांसाठी प्रीमियम – भरण्यासाठी पुरेसे पैसे आहेत हे लक्षात ठेवा.

–   कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी आयुक्त सर्व बाबी बरोबर असल्याची खात्री करून घेतील, त्यानंतर ते पेमेंट करतील.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO नोकरदारांना अडचणीच्या काळात वापरण्यासाठी पीएफची काही रक्कम आगाऊ काढण्याची ही सुविधा दिली आहे. EPFO ने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला होता. त्यानुसार पीएफधारक कोणत्याही कागदपत्रांशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो. आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही. फक्त एक विनंती अर्ज सादर करून तुम्ही हे पैसे मिळवू शकता.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *