Breaking News

आता महसूल मंत्री थोरातही कोरोना पॉझिटीव्ह फेसबुकवरून आणि ट्विटरवरून दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम

हिवाळी अधिवेशनापासून राज्याचे मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण वाढलेले असून या यादीत आता राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मंत्री थोरात यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून दिली.

ऐन हिवाळी अधिवेशन सुरु असताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांनी घरी राहणे पसंत करत उपचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नात गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी चाचणी केली असता त्यांचीही चाचणी सकारात्मक आली. तर कालच भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनीच जाहीर केली. त्यानंतर आज संध्याकाळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जाहीर दिली.

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *