Breaking News

त्या दिवशी विधान परिषदेत काय घडले? उपसभापती कार्यालयाने दिला घटनाक्रम विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाने दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम

बोलण्याची संधी नाकारल्याच्या कारणावरून विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला आहे. मात्र त्या दिवशी अर्थात काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधीच्या वेळी नेमके काय झाले याची माहिती उप सभापती कार्यालयाने जाहिर केली आहे. ती माहिती खालील प्रमाणे त्यांच्याच कार्यालयाच्या शब्दात…

अकोला महानगरपालिकेत झालेल्या गैरप्रकारबद्दल लक्षवेधी आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केली होती. या लक्षवेधी दरम्यान विरोधी पक्ष नेत्याने बोलायला दिले नाही होते. हे स्पष्ट होतं की आ.बाजोरिया यांनी लक्षवेधी पुकारली. त्याच्यानंतर मंत्रीमहोदयांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि मंत्र्यांचे उत्तर पूर्ण होऊन पुढे कुठल्या सभासदांना संधी मिळणार आहे. त्याच्या आधीच विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप नोंदवला होता.  तो आक्षेप असा होता हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्याच्यावर चर्चा होणे नये. परंतु विधिमंडळ सचिवालयाने या बद्दल चा पूर्ण अभ्यास करून आणि पूर्वीच्या कामकाजाचा संदर्भ घेऊन जो निकाल दिला होता तो निर्णय उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी वाचून दाखविला.

“तो निर्णय घोषित केला होता, की न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या निर्णयावरही परिणाम होईल अशा प्रकारची चर्चा करता येणार नाही परंतु चर्चा विधिमंडळात होऊ शकते तो विधिमंडळाचा सार्वभौम अधिकार आहे.” हा निर्णय उपसभापती यांनी जाहीर केल्यानंतर या लक्षवेधीला सुरुवात झाली. लक्षवेधीला सुरुवात झाल्यावरती बाजोरिया यांनी बाजू मांडून मंत्रीमहोदयांनी उत्तर देत असतानाच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व सभासदांनी मधल्या वेलमध्ये धाव घेतली आणि घोषणाबाजी सुरू केली. थोडक्या मध्ये त्यांनी बोलायची परवानगी मागितली आणि ती मिळाली नाही असं झालं नाही.

उपसभापती यांनी निर्णय दिल्यावर सुद्धा आणि जो विधिमंडळातील संदर्भामध्ये एखाद्या भ्रष्टाचाराच्या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये संबंधित असणाऱ्या लोकहिताच्या प्रश्नावरती लक्षवेधी हा सार्वभौम विधिमंडळाची अधिकार असून सुद्धा आणि तसा निर्णय देऊन सुद्धा विरोधी पक्षनेते यांनी लक्षवेधीवर बोलण्याचा ऐवजी व मंत्र्यांचे उत्तर काय येते ते बघून योग्य ती बाजू मांडणं हे केलं नाही. इतकेच नव्हे तर विरोधी पक्षातील सदस्यांनी पण ताबडतोबच बोलण्याची संधी मागण्याच्या ऐवजी सर्वांनीच वेलमध्ये मध्ये धाव घेतलेली गोंधळाला सुरुवात झाली. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे विरोधी पक्षनेत्यांना बोलून न देणं हे उपसभापती यांनी केलं नाही. उलट उपसभापती यांनी त्यांचा आक्षेप नोंदवून त्याचे निराकरण केलं आणि मग लक्षवेधीला सुरुवात केली. हे सर्वांच्या समोर सीसीटीव्ही समोर आणि माध्यमांसमोर लाईव्ह प्रक्षेपित झालेले आहे. त्यातूनच काय ते चित्र स्पष्ट होत आहे.

Check Also

पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *