Breaking News

काँग्रेसच्या बैठकीत झाला “हा” निर्णय: मात्र जी २३ नेत्यांनी केली ही मागणी चार तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत निर्णय

देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक बोलाविली. जवळपास चार तासाहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत पुन्हा एकदा प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसने विश्वास दाखविला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पुढील वाटचाल करणार असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले.

विधानसभां निवडणूकांमध्ये झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सर्वचस्तरातून काँग्रेसवर टीकेची झोड उठविण्यता येत होती. त्याच आज होणाऱ्या बैठकीत गांधी कुटुंबिय आपल्या पदांचे राजीनामे देणार असल्याचे वृत्त काल व्हायरल झाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीत नेमके काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले होते.

या बैठकीला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, पक्षाच्या सचिव प्रियंका गांधी, के.वेणूगोपाल, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, खासदार पी.चिदंबरम आदी नेते उपस्थित होते.

गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, पाचही राज्यातील पराभवावर या बैठकीत चर्चा झाली. खासकरून उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या दारूण पराभवाची. त्याचबरोबर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीमुळे काँग्रेसचा पराभव झाला तर गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाकडून सता खेचून घेण्यात पक्षाला आलेल्या अपयशावरही चर्चा झाली.

दरम्यान काँग्रेस नेते तथा खासदार आणि जी २३ गटाचे शशी थरूर यांनी पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याबाबत भाष्य करत सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेस आहे. काँग्रेस हा आजही प्रबळ विरोधक आणि पक्ष म्हणून सर्वात मजबूत पक्ष आहे. म्हणूनच सुधारणा आणि आणि बदल आवश्यक आहेत असे मत ट्विटरद्वारे मांडले.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *