Breaking News

नवाब मलिकांची मुलगी म्हणाली डॉ.लांबेची नियुक्ती फडणवीसांनीच केली: हा घ्या पुरावा फडणवीस गेले बॅकफुटवर

संध्याकाळी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा पेन ड्राईव्ह विधानसभेत सादर करत राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या वक्फ बोर्डावर दाऊद इब्राहीमच्या गँगशी संबधित व्यक्तीच्या नातेवाईकाची वर्णी लावल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आणली. तसेच त्या व्यक्तीकडून स्वतःहून फोनवरील संभाषणात सांगत असल्याचा दावाही केला. त्यावर नवाब मलिकांची मुलगी तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सना मलिक-शेख यांनी फडणवीसांच्या या आरोपातील हवा काढून घेत ती नेमणूक देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा दावा करत डॉ लांबे आणि फडणवीसांचा एक फोटोही ट्विट केला.

दाऊद इब्राहीम या डॉनचा राईट हॅण्ड राहीलेल्या व्यक्तीचा डॉ मुदस्सर लांबे हे जावई आहे. याचे लग्न दाऊदची बहीण हसीना पारकर हिने जुळवून दिल्याचा दावाही फडणवीस यांनी केला. त्यासाठी फडणवीसांनी डॉ लांबे आणि अर्शद खान या दोघांमध्ये झालेल्या फोनवरील  संवादाचा पेन ड्राईव्हही विधानसभेत सादर केला. तसेच त्या दोघांमध्ये नेमके काय संभाषण झाले हे वाचूनही दाखविले.

त्यावर सना मलिक-शेख यांनी ट्विट करत म्हणाल्या की, माझे वडील न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांच्याशी संबधित कोणीही खोटे बोलेल आणि त्यांचा संबध कारण नसताना डी-गँगशी जोडेल तर अशांच्या खोट्या बोलण्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. तसेच अशा लोकांच्या विरोधात लढण्यासाठी समर्थ असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

त्याचबरोबर सना मलिक-शेख यांनी फडणवीस सरकारच्या काळात डॉ.लांबे यांच्या नेमणूकीच्या अनुषंगाने त्यावेळी प्रसिध्द झालेले गॅझेटही त्यांनी ट्विटद्वारे प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून दिले.

आता नवाब मलिकांच्या मुलीनेच याबाबतची माहिती प्रसिध्द केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपातील हवाच निघुन गेली असेच म्हणावे लागेल. तसेच त्यांना बँकफूटवर जाण्यावाचून पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. परंतु राज्य सरकारच्या नजरेतून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचेच गृहमंत्री असलेले दिलीप वळसे-पाटील यांच्या नजरेतून ही गोष्टी कशी सुटली हे विशेष असून फडणवीस यांनी हा विषय सभागृहात मांडल्यानंतर डॉ.लांबे हे वक्फ बोर्डाच्या निवडणूकीत निवडूण आलेले असून त्यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली नसल्याचे स्पष्ट केले.

 

Check Also

राज्यसभासाठीच्या ५७ पैकी ४१ जागी बिनविरोध निवडणूक; हे उमेदवार आले निवडूण कपिल सिब्बल, पी.चिदमबरम, राजीव शुक्ला आदी विजयी

राज्यसभेतून १५ राज्यांतील ५७ सदस्य निवृत्त झाल्याने त्यासाठी आज मतदान घेण्यात आले. एकूण ५७ जागांपैकी …

Leave a Reply

Your email address will not be published.