Breaking News

फडणवीसांनी फोडला दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्बः दाऊदचे नातेवाईक या बोर्डावर अर्थसंकल्पिय अधिवेशनातील दुसरा बॉम्ब

अर्थसंकल्पिय चर्चत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण संपविता संपविता दुसरा एक पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडत अल्पसंख्याक विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वक्फ बोर्डावरील सदस्य हे अडंरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचे नातेवाईक असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत डॉ.मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्या फोन संभाषणच त्यांनी यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपुर्द केले.

डॉ. मुदस्सिर लांबे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. ज्या स्त्रीवर त्यांनी बलात्कार केला त्या स्त्रीला त्यांनी नंतर लग्नाचे आश्वासन दिले. मात्र कालांतराने त्या महिलेला धमकावले. तसेच त्याच बलात्कारीत स्त्रीच्या नवऱ्याच्या विरोधात लांबे यांने चोरीची तक्रार दाखल करत तुरुंगात पाठविले. डॉ. लांबे हे दाऊद इब्राहीमच्या टोळीशी संबधित असल्याचे फोन संभाषण हाती आले असून त्यातील काही संभाषण आपण वाचून दाखवित असल्याचे सांगत फडणवीस यांनी डॉ. मुदस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाची स्क्रिप्ट त्यांनी वाचून दाखविली. यावेळी लांबे यांनी वक्फ बोर्डातून कसे पैसे कमवायचे हे ही सांगत असल्याचे त्यांनी सांगितले.

या लांबे याची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केल्याचा दावा करत आघाडी सरकारला सगळी दाऊदचीच माणसे कशी भेटतात असा खोचक सवालही त्यांनी केला.

पात्र दोन आहेत.

एक आहेत, मो. अरशद खान आणि दुसरे आहेत डॉ. मुद्दस्सिर लांबे.

संवाद : सलामवालेकूम

डॉ. लांबे : मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम… मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे पहले और मेरा रिश्ता जो हसिना आपा ने कराई थी. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दारुद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है.

अर्शद खान : तुमने उनके साथ अन्वर का नाम तो सुना होगा. वो मेरे चाचा है. वो भी उनके साथ ही रहते थे. मतलब स्टार्ट सें रहते थे. अभी इंतकाल हुआ उनका.

डॉ. लांबे : मेरा ससूर पुरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लॅक बेल्ट थे और पुरा वही संभालते.

अर्शद खान : अच्छा. बॉम्बे में मेरे चाचा थे और पुरा संभालते थे. जब मै मदनपुरा में था. भेंडी बाजार में मेरी पैदाईश है.

डॉ. लांबे : मेरे घर में कोई मसला होता है तो वहाँ तक पहुचता है. सिधी बात सोहेल भाई तक पहुंचती है. अभी चार-पास दिन सें मेंरे घर में मसला चल रहा है. लगता है की, अपनी आप की जान देने जैसा है.

अर्शद खान : इसलिए मैने पुछा सही सही तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नही मेरा अपना टेंशन है.

डॉ. लांबे : अर्शद मै तो बोलता हु की, तुम अभी तुम अभी वकफ के काम पकडो. अभी अपने पास पॉवर है. अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो. पुरे वकफ के काम शुरू करो. कमाने का सेंटिंग करो. तुम्हारा आधा और मेरा आधा

अर्शद खान : अभी मै बैठुंगा और तुमसे पर्सनली ये सब चीज में बैठुंगा. अपना एक बंदा ले के आऊंगा और काम पकडुंगा.

डॉ. लांबे : मेरे माहीम में कैसा होता मालूम है क्या, मेरे साथ क्या हुआ तो पुरे लोग साथ में आते है.

अर्शद खान: अर्शद के नाम सें बिल्डींग ले. अर्शद मेरा भरोसे का आदमी है. कई पलटी नही मारेगा.

डॉ. लांबे : तुम्हारे उपर इनक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे पर नही बैठ सकती.

या पध्दतीचे संभाषण झाले असून यातील हर्षद खान हा पोलिसांच्या ताब्यात असून फोनही त्याच्याच ताब्यात आहे. त्यामुळे ते फोन लगेच ताब्यात घ्यावे जेणे करून ते डिलीट करू नये असे आवाहनही त्यांनी या केले.

Check Also

जयंत पाटील केंद्रीय मंत्र्यांना म्हणाले, युपीए सरकारच्या काळातील ‘ती’ योजना पुन्हा सुरू करा धरण सुरक्षितता कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेला गती मिळावी - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

देशातील ४० टक्के मोठी धरणे महाराष्ट्रात असून  केंद्र शासनाच्या ‘धरण सुरक्षितता कायदा-२०२१’ अंतर्गत या धरणांच्या सुरक्षिततेला …

Leave a Reply

Your email address will not be published.